konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 67 2

चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’

आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; विविध संस्थांची मागणी चिपळूण, प्रतिनिधी : चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कला दालनास ‘निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन’ असे नाव देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विविध सामाजिक संस्थांनी याबाबत आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. आमदार निकम यांनी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महसूल व वन विभागाने ही मान्यता दिली. रत्नागिरी जिल्हा वन विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चिपळूण येथील वन विभाग संकुलात आकर्षक व अभ्यासपूर्ण कलादालन उभारण्यात आले आहे. या कलादालनाची संकल्पना, आराखडा आणि मूळ मांडणी तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक स्वर्गीय निलेश विलास बापट यांची होती. स्व. बापट यांनी निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव आणि जैवविविधता संरक्षणासाठी आयुष्य वाहिले होते. ‘सह्याद्री निसर्गमित्र’, ‘ग्लोबल चिपळूण’ आणि ‘आरोही’ या संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच विविध अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण आणि वन्यजीव बचाव मोहिमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, रंजिता फाउंडेशन, नवकोकण एज्युकेशन सोसायटी, सह्याद्री निसर्गमित्र, नगरसेवक निहार कोवळे आणि परिवर्तन संस्था यांनी या कलादालनास स्व. बापट यांचे नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर वन विभागाने प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्यास मंजुरी दिली असून विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांचीही या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. या निर्णयाबद्दल चिपळूणवासीयांनी समाधान व्यक्त केले असून विविध संस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.  

चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’ Read More »

konkandhara 66 2

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजय पिळणकर सावंतवाडी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे हॉस्पिटल सावंतवाडीऐवजी वेत्ये येथे हलविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर गोव्यात हलविण्याची वेळ येत असून, यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जागेअभावी सावंतवाडीत हॉस्पिटल शक्य नसल्यास ते वेत्ये येथे हलवावे. त्यासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देण्याची तयारी जितेंद्र गावकर यांनी दर्शविली आहे. यासंदर्भात निर्णय घेताना पाठपुरावा करणारे आमदार दीपक केसरकर यांच्या संमतीने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली आहे.

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर Read More »

konkandhara 31 2

मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी मित्राने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी विकून तसेच एक अंगठी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्याचे तब्बल 1 लाख 55 हजार रुपये लाटेल. याप्रकरणी संशयित मित्राविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 29 मार्च रोजी सकाळी 11 ते 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.कालावधीत शहरातील आरोग्य मंदिर व मारुती मंदिर येथे परिसरात घडली आहे.प्रथम जयेश खानविलकर (23,मुळ रा.राजीवडा सध्या रा.शांतीनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मित्राचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रसाद रविंद्र पोकळे (25,रा.मारुती मंदिर,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तकार दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही मित्र आहेत. 29 मार्च 2026 रोजी प्रसाद पोकळेने त्याच्या वडिलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या त्याचा मित्र प्रथम खानविलकर याच्याकडे अधिकचे सोने घालून काम करुन आणण्यासाठी विश्वासाने दिल्या होत्या. परंतू प्रथम खानविलकरने त्यातील एक अंगठी सोनाराला विकली. तसेच दूसरी अंगठी ही मुथ्थूट फायनान्स कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले. अशाप्रकारे दोन्ही अंगठ्यांवर त्याने एकूण 1 लाख 55 हजार रुपये घेउन स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. दरम्यान, 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वा.सुमारास प्रसादने प्रथमकडे दोन्ही अंगठ्यांची मागणी केली. तेव्हा प्रथमने त्याला मी तुला कोणतेही पैसे देणार नाही, ना अंगठ्या देणार. जास्त त्रास दिलास तर तुझे हातपाय तोडून तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत

मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल Read More »

konkandhara 30 2

टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या

रत्नागिरी : प्रतिनिधीतालुक्यातील टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून व दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास घ्ोत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार एप्रिल रोजी रात्री 9 ते बुधवार एप्रिल रोजी सकाळी 6.45 वा.कालावधीत घडली आहे.मंगेश तुकाराम कांबळे (41, रा.टिके भातडेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश हा आजारी होता तसेच, त्याला दारुचेही व्यसन होते. या दोन्ही कारणांमुळे त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या Read More »

konkandhara 29 1

रत्नागिरीत माणुसकीचे दर्शन: रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी रिक्षाचालक बनला ‘देवदूत’

माणुसकीचा जिवंत प्रत्यय: चांदसूर्या स्टॉपजवळ अपघात; रिक्षाचालक आदित्य पावसकर यांची तत्परता ठरली जीवदान देणारी रत्नागिरी ः प्रतिनिधीतालुक्यातील चांदसूर्या स्टॉपजवळ गुरुवार, 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास झालेल्या वाहन अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मात्र, प्रसंगावधान राखत रिक्षाचालकांनी दाखविलेल्या धाडस आणि तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.जयसूर्या शांताराम मांडवकर (वय 38, रा. कापडगाव) हे अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र, या गंभीर परिस्थितीत वेळ न दवडता रिक्षाचालक आदित्य अनंत पावसकर (रा. गावडे आंबोरे) यांनी माणुसकीचा परिचय देत तातडीने पुढाकार घेतला. पावसकर हे आपल्या रिक्षाचे पासिंग काम आटोपून रत्नागिरीत परतत होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी मांडवकर यांना आपल्या रिक्षामध्ये घेतले. यावेळी रुपेश पालकर (रा. पाली) यांनीही तत्पर सहकार्य करत आपली दुचाकी तिथेच उभी करून रिक्षामधून जखमी मांडवकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी मांडवकर यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.आदित्य पावसकर या रिक्षाचालकानी दाखविलेल्या धाडसी आणि मानवतावादी कृतीमुळे रत्नागिरीत त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रत्नागिरीत माणुसकीचे दर्शन: रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी रिक्षाचालक बनला ‘देवदूत’ Read More »

konkandhara 28 1

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा राजकीय डाव : भास्कर जाधव

चिपळूण: नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून केंद्र सरकार देशात राजकीय अजेंडा राबवत असून, मोठ्या राज्यांतील खासदारांची संख्या वाढवून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला. विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध नसून केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणाच्या विषयावर पत्रकार, विविध राजकीय पदाधिकारी तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जाधव म्हणाले, केंद्र सरकारने १६ ते १८ एप्रिलदरम्यान तीन कायदे मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले होते. मात्र विरोधात २४८ खासदारांनी मतदान केल्याने ती विधेयके फेटाळण्यात आली. नारीशक्ती वंदन विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नसून, त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या पाच दिवसीय अधिवेशनात महिला आरक्षणाच्या बाजूने ४५२ मते पडली होती, तर विरोधात केवळ दोन मते होती. त्यामुळे विरोधक महिला आरक्षणाच्या विरोधात असल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक पुन्हा पुढे आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदारांची संख्या ५४३ वरून ८५० करण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मतदारसंघ निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसून तो निवडणूक आयोगाचा आहे. मात्र स्वायत्त संस्थांवर सरकारचा प्रभाव वाढल्याचाही आरोप त्यांनी केला. ठरावीक मोठ्या राज्यांना खूश ठेवून त्यांच्या बळावर पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचेही जाधव यांनी नमूद केले.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा राजकीय डाव : भास्कर जाधव Read More »

konkandhara 25 1

उंच उडी स्पर्धेत साईश भटचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

दोडामार्ग : भूषण सावंत : उंच उडी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत साईश सूर्यकांत भट याने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर यांच्या हस्ते त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. दीक्षा गवस, भाजप बूथ अध्यक्ष कुणाल घाडी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुचिता भट, विजया घाडी, माजी सरपंच प्रकाश गवस, शाळेचे मुख्याध्यापक नाईक सर, पांडुरंग भट, आशाताई, तन्वी गवस, तसेच शिक्षक श्री भोसले सर, श्री नवगिरे सर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साईश भटच्या या यशामुळे शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढला असून, उपस्थित मान्यवरांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याची कामना व्यक्त केली.

उंच उडी स्पर्धेत साईश भटचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; सत्कार सोहळा उत्साहात संपन्न Read More »

konkandhara 23 1

लाडक्या बहिणींची गैरसोय खपवून घेणार नाही!चिपळूण युवासेना आक्रमक

चिपळूण : कळमुंडी गावातील “माझी लाडकी बहीण योजना” लाभार्थी महिलांना गेल्या सहा महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमधून पैसे मिळत नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत युवासेना तालुका प्रमुख श्री. प्रितम नंदकुमार वंजारे यांनी आज मार्गताम्हाणे पोस्ट ऑफिसला निवेदन देत तात्काळ तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी केली. महिलांची गैरसोय त्वरित दूर करावी, अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.

लाडक्या बहिणींची गैरसोय खपवून घेणार नाही!चिपळूण युवासेना आक्रमक Read More »

konkandhara 13 2

चिपळूणला अवकाळी पावसाचा तडाखा; मुरादपूर भोईवाडीत फांद्या कोसळल्या

चिपळूण : आज गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिपळूण शहराला अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली, तर व्यापाऱ्यांचीही धावपळ झाली. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर आंबा बागायतदारांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हाताशी आलेले आंब्याचे पीक या पावसामुळे नुकसानग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. जवळपास एक तास हा अवकाळी पाऊस जोरदारपणे बरसत होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुरादपूर भोईवाडी येथे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याची घटना घडली आहे. पहिल्याच पावसात अशी बिकट अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चिपळूणला अवकाळी पावसाचा तडाखा; मुरादपूर भोईवाडीत फांद्या कोसळल्या Read More »

konkandhara 12 2

दशावतार कलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणारा युवा कलाकार कृष्णा लाड सन्मानित

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजय पिळणकर सावंतवाडी, ता. २३ : सिंधुदुर्गच्या समृद्ध दशावतार कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे अभ्यासू युवा कलाकार कृष्णा उर्फ साहिल शंकर लाड यांना “राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद गोवा-महाराष्ट्र राज्य २०२६” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान पणजी येथील कला व संस्कृती भवन येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, गोवा आमदार रॉडॉल्फो फर्नांडिस, निवृत्त प्राध्यापक उल्हास प्रभू देसाई तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेते अभय खडपकर यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. साहिल लाड गेली १४ वर्षे दशावतार कलेत सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात शालेय जीवनात, इयत्ता चौथीत असतानाच झाली. लहानपणी आई-वडिलांनी आवर्जून नाटक पाहायला नेल्याने त्यांच्या मनावर या कलेचे संस्कार झाले. त्यामुळेच ते आपल्या आई-वडिलांना आपले पहिले गुरू मानतात. आजवर त्यांनी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ (मुंबई), खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली), बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ (दोडामार्ग), मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ (मोचेमाड) तसेच रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ (हुमरस) अशा विविध नामांकित नाट्यमंडळांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या ते जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस-दांडेली (सावंतवाडी) येथे कार्यरत आहेत. या क्षेत्रात कार्य करताना त्यांना शंकर पिळणकर, गोविंद मराठे, विनोद घोणे, शंकर मेस्त्री, गणपत मांजरेकर, विलास गावस, गौरव शिर्के, दादा राणे, सिद्धार्थ मेस्त्री, ज्ञानेश्वर नाईक आणि नारायण आशियेकर यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पंढरी घाटकर, चारुदास मांजरेकर, प्रथमेश मेस्त्री आणि रमेश शिरोडकर यांच्या भूमिकांना आदर्श मानून व प्रेरणा घेत त्यांनी आपली अभिनय शैली अधिक परिपक्व केली. या राष्ट्रीय सन्मानाचे संपूर्ण श्रेय त्यांनी ज्येष्ठ कलाकार दादा राणे यांना दिले असून, त्यांच्या या यशामुळे हुमरस गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने दशावतार कलेला नवी उंची मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दशावतार कलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणारा युवा कलाकार कृष्णा लाड सन्मानित Read More »