konkandhara.com

राजकारण

महिला आरक्षणाचा बनाव उघडा, 'डीलिमिटेशन' हा देश तोडण्याचा कट; खासदार संजय सिंह यांचा घणाघात!

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे फायरब्रँड नेते खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी पाडल्याचा जो कांगावा भाजप करत आहे, तो पूर्णपणे पायाहीन असून भाजपचा खरा चेहरा आता देशासमोर उघडा पडला आहे, असा घणाघात त्यांनी केला. संजय सिंह यांनी कागदपत्रे दाखवत ठणकावून सांगितले की, २०२३ मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक १६ एप्रिल २०२६ रोजीच अधिसूचित झाले असून ते आज देशात लागू आहे. मग काल नेमका कोणता खेळ खेळला गेला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारची पोलखोल केली. संजय सिंह यांनी भाजपला घेरताना म्हटले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली ‘डीलिमिटेशन’ म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेचे जे पाप सरकार करू पाहत होते, ते केवळ देशाच्या तुकडे-तुकडे गँगचा अजेंडा होता. या विधेयकाच्या आडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात वादाची ठिणगी टाकण्याचे कारस्थान रचले गेले होते. तामिळनाडू आणि बंगालसारख्या राज्यांच्या संसदेतील जागा कमी करून त्या राज्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत होते, ज्याला आम्ही आणि संपूर्ण इंडिया आघाडीने खंबीरपणे विरोध करून धूळ चारली आहे. “आम्ही देश तुटू देणार नाही आणि राज्या-राज्यांमध्ये भांडणे लावण्याचा भाजपचा मनसुबा कधीही पूर्ण होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी या वेळी दिला. भाजपच्या मातृसंस्थेवर निशाणा साधताना संजय सिंह म्हणाले की, ज्या आरएसएसने १०० वर्षांच्या इतिहासात कधीही एका महिलेला प्रमुख पद दिले नाही आणि ज्या भाजपमध्ये महिलांना केवळ निवडणुकीचे साधन मानले जाते, त्यांनी आम्हाला महिला हित शिकवू नये. मणिपूरमध्ये महिलांची विटंबना झाली तेव्हा मोदीजी गप्प होते, हाथरस आणि अंकिता भंडारी प्रकरणात भाजपचे नेते बलात्काऱ्यांना संरक्षण देत होते, तेव्हा त्यांचे महिला प्रेम कुठे गेले होते, असा बोचरा सवाल त्यांनी विचारला. बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सहानुभूती मिळवण्यासाठी हा सारा प्रपंचा रचला गेला होता, पण आता हा डाव भाजपवरच उलटला असून दक्षिण भारतातून त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय सिंह यांनी एका स्टिंग ऑपरेशनचा दाखला देत भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. बाबरी मशीद बांधण्याचा दावा करणाऱ्या हुमायून कबीरला भाजपने १००० कोटी रुपये दिले असून केंद्र सरकारने त्याला झेड श्रेणीची सुरक्षा का पुरवली आहे, याचे उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजप एका बाजूला धर्माचे राजकारण करते आणि दुसरीकडे पडद्यामागून काय खेळ खेळते, हे आता जनतेला समजले आहे. शेवटी, महिला आरक्षण सुरक्षित आहे आणि राहील, पण भाजपचे ‘डीलिमिटेशन’चे राजकारण आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा वज्रनिर्धार त्यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह Read More »

उमेश खताते शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात; चिपळूणात ठाकरे गटाला धक्का

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले उमेश खताते यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.मंगळवारी मुंबईतील ‘नंदनवन’ या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात ठाकरे गटाचे चिपळूण युवासेना प्रमुख उमेश खताते यांनी आपल्या सुमारे साडेतीनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,“उमेश खताते हे तळागाळात काम करणारे आणि लोकांच्या अडचणीच्या काळात पुढे येणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल. पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांचा पुढील राजकीय प्रवास उज्वल राहील.” या पक्षप्रवेशावेळी उमेश खताते यांच्यासह विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती सावंत-देसाई, इकबाल बेबाल, विराज खताते, समीर कदम, मुराद चौगुले, वहाब बेबाल, सुमित भुरण, संदेश शिगवण, संतोष मिरगल, प्रफुल चाळके, अमित कांबळी, अमन कडवेकर, मुबारक सकवारे, अनिल पाटील, सचिन धांडे, लक्ष्मण शेळके, सुमेध भुरण, दीप्ती भुरण, साहिल भुरण, अखिलेश खेडेकर, रुपेश खताते, मयूर भालेकर, मंगेश भुरण, शुभम महाडिक, विशाल खताते, स्वप्नील जंगम, सुशील संगम, मंगेश गायकवाड, शुभम मिरगळ, योगेश खताते, सुमित खेडेकर, शौकत चौगुले, ओंकार जंगम, निनाद नाचरे, वेदांत कदम, सारिका कदम, शिल्पा खताते, स्वाती खताते, मनिष खताते, अनिल शिगवण, अमये शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांचे पक्षात स्वागत केले. या सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते राजन साळवी, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का Read More »

रईस अलवी यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकट करण्यासोबतच धार्मिक तणावाला बळी न पडता सामाजिक ऐक्य अबाधित राखणे, तसेच अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढा उभारणे यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.यावेळी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच पक्ष संघटनेतील विविध पदांवर नियुक्त्याही करण्यात आल्या. या बैठकीत रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या फेरनिवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यकाळाकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या महत्वपूर्ण बैठकीस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी सहअध्यक्ष सोहेल सुभेदार, अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख अफजल फारूक, प्रदेश कार्याध्यक्ष मुजाहिद खान, वारीस पठाण, प्रदेश उपाध्यक्ष रहेमान खान पठाण, सय्यद अन्सारअली, शमीम अहमद, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, तसेच सुहास उभे, मुबिन भाई परकर, मोहसीन मुल्ला यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड Read More »

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ Read More »

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अस्वस्थतेची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कदम यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सादर केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामकाजाला अपेक्षित वेळ देता येत नसल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जबाबदाऱ्या पार पाडण्यात काही अडचणी येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. स.तु. कदम यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, मतदार संघातील काही सरपंच आणि स्थानिक पदाधिकारी शिवसेना (शिंदे गट) कडे झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तसेच नुकतेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले अजय बिरवटकर यांच्याबाबतही काही कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, बिरवटकर हे सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय/नातेवाईक असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास अनेक कार्यकर्ते टाळाटाळ करत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींमुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटन टिकवणे, नाराज गटांना सांभाळणे आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता पक्ष नेतृत्व नव्या तालुकाध्यक्षाची निवड करून परिस्थिती कशी हाताळते आणि अस्वस्थ कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने एकत्र ठेवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान Read More »

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त, मनोज शिंदे हकालपट्टी

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी

प्रतिनिधी : कोकणधारा रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली असून, माजी तालुका प्रमुख व माजी उपजिल्हाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहा नगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा संशय मनोजकुमार शिंदे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळाले असले, तरी मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या अपयशामागे पक्षविरोधी वर्तणूक कारणीभूत ठरल्याचा ठपका पक्षाने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली रोहा येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तालुक्यातील राजकीय घडामोडी, संघटनात्मक स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला.कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मनोजकुमार शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, केवळ व्यक्तीवर कारवाई करून न थांबता संपूर्ण रोहा तालुका कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला. पक्ष संघटना नव्याने उभारण्यासाठी लवकरच निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांची नवीन फळी जाहीर केली जाईल, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मनोजकुमार शिंदे यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, मात्र आता त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई झाल्याने रोहा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजा केणी यांचे वक्तव्य“पक्षामध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करणे संघटनेच्या हिताचे आहे. लवकरच रोहा तालुक्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.”— राजा केणी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (रायगड)

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी Read More »

विलीनीकरणाचा विषय संपला : विकास लवांडे; सुनील तटकरेंवर दुतोंडीपणाचा आरोप

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार गटाने ठाम भूमिका घेत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्या पातळीवरून पूर्णपणे संपला असून आगामी निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे संभ्रम अधिक वाढला. 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्च रोजी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चर्चेबाबत माहिती असल्याचे सांगत, विलीनीकरण झाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असे मत व्यक्त केले. या बदलत्या भूमिकेवर टीका करत लवांडे यांनी तटकरे यांच्यावर दुतोंडीपणाचा आरोप केला. “सुनील तटकरे हे खोटे बोलतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्य नाही,” असे ते म्हणाले. “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” अशी म्हण उद्धृत करत त्यांनी तटकरेंवर टोला लगावला. लवांडे यांनी पुढे सांगितले की, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच विलीनीकरणाच्या शक्यतांना नकार दिला आहे. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत म्हटले की, कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. “पक्ष स्वतंत्रपणे संघटन मजबूत करत पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चांना फेटाळल्याचे अधोरेखित केले. या चर्चांना काही जण स्वार्थी राजकारणाच्या हेतूने हवा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील मतभेद अधोरेखित झाले आहेत. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे शरद पवार गटाने स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे Read More »

रायगडमध्ये NCP बॅनर वाद: अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचे फोटो

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो

प्रतिनिधी : कोकणधारा रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर मात्र खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेच फोटो झळकले. हा कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते. तरीही पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर नसल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वीही राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्याचे आरोप झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर रायगडमधील या बॅनर प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे मनसुबे आता उघड झाले आहेत. त्याची सुरुवात रायगडमधून होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “हिम्मत असेल तर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत वेगळा पक्ष काढा किंवा भाजपमध्ये जा,” असा टोला देखील त्यांनी लगावला. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो Read More »

अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रफुल्ल बाईत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा होताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन केले. या निवडीनंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर पंचायत समितीवर महायुतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि सभापतीपदासाठी शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेदरम्यान या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरा कोणताही अर्ज दाखल न झाल्याने शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी तर प्रफुल्ल बाईत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, राजेश मुकादम, राजेश पत्याणे, प्रमोद पवार, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रोहन बने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम, वैभव पवार, राजन कापडी, संजय कदम, राजेंद्र सुर्वे, हेमंत शिंदे, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, दिलीप बोथले, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, यशवंत गोपाळ, पंकज पुसाळकर, पप्पू नाखरेकर, बापू शिंदे, मंगेश दळवी, प्रसाद सावंत, सचिन मांगले, योगेश शिंदे आदींसह पंचायत समितीचे सदस्य, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव व पूजा निकम यांनी नूतन सभापती व उपसभापतींना शुभेच्छा देत संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. नूतन सभापती शर्वरी वेल्ये आणि उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनीही वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर दोघांनाही सभागृहात त्यांच्या पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले.

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह Read More »

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य नव्हे तर सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पुढे येत राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवावी,” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोपवेने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “९ मार्चला वर्धापन दिन आणि १९ मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा असल्यामुळे दोनदा भाषण करण्यापेक्षा सर्व मुद्द्यांवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. मात्र आजपासून पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, राज्यभरातील वर्दळीच्या ठिकाणी मनसेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स उभारावेत. मनसैनिकांनी लोकांपर्यंत जाऊन संवाद साधावा आणि इच्छुकांना पक्षाचे सदस्य करून घ्यावे. “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरून पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी सर्व मनसैनिकांनी आणि महाराष्ट्राच्या हितचिंतकांनी शिवतीर्थावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले.

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात Read More »