konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.

उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत.

उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे