“बंडखोर”चा दमदार शुभारंभ! महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली नव्या मराठी सिनेमाचा बिगुल
दोडामार्ग – भूषण सावंत : मराठी चित्रपटसृष्टीत नव्या जोमाने धडाकेबाज एन्ट्री करत “बंडखोर” या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगला भव्य सुरुवात झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेल्या या चित्रपटाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यामुळे चित्रपटसृष्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून “बंडखोर” हा चित्रपट कथानक, अभिनय आणि मांडणीच्या जोरावर वेगळी छाप पाडणार असल्याची चर्चा रंगली आहे. चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी, दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या छाया कदम, तसेच मनीष सावंत यांच्यासह तब्बल २० कलाकारांची भक्कम फौज पाहायला मिळणार आहे. विविध भूमिका आणि तगड्या व्यक्तिरेखा यामुळे चित्रपट अधिक प्रभावी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निर्माते संजय शेट्ये यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना मोठी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे गोवा आणि परिसरातील नवोदित कलाकारांसाठी “बंडखोर” हा एक सुवर्णसंधी ठरणार आहे. चित्रपटाचे शूटिंग गोव्यातील निसर्गरम्य लोकेशन्सवर होणार असून, कथा आणि सादरीकरणाच्या जोरावर “बंडखोर” प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवे प्रयोग आणि दमदार कथा घेऊन येणारा “बंडखोर” आता किती गाजतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
“बंडखोर”चा दमदार शुभारंभ! महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली नव्या मराठी सिनेमाचा बिगुल Read More »








