konkandhara.com

  • Home
  • मनोरंजन
  • संगमेश्वरच्या साखरपा गावची तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता
तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता

संगमेश्वरच्या साखरपा गावची तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6चे विजेतेपद पटकावले आहे. 19 एप्रिल रोजी उत्साहात पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये तिने दमदार कामगिरी करत महाट्रॉफीवर आपले नाव कोरले. अभिनेता राकेश बापट याने उपविजेतेपद मिळवले.

जानेवारी 2026 मध्ये कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या सिझनने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनेता रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखालील या पर्वाला मोठी लोकप्रियता लाभली. विशेषतः ‘भाऊचा धक्का’ या भागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अंतिम फेरीत पोहोचलेल्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन यांचा समावेश होता. तन्वीला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाल्यामुळे ती थेट अंतिम फेरीत पोहोचली होती. 100 दिवसांच्या या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी विविध टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली.

शेवटच्या टप्प्यात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे तन्वीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Releated Posts

“बंडखोर”चा दमदार शुभारंभ! महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली नव्या मराठी सिनेमाचा बिगुल

दोडामार्ग – भूषण सावंत : मराठी चित्रपटसृष्टीत नव्या जोमाने धडाकेबाज एन्ट्री करत “बंडखोर” या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगला भव्य…

ByByEditorial मई 5, 2026

बॉलिवूडचे ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांचं ८४ व्या वर्षी निधन

📰 बॉलिवूडचे ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांचं ८४ व्या वर्षी निधन 📍 मुंबई | २० ऑक्टोबर २०२५:भारतीय चित्रपटसृष्टीतील…

ByByEditorial अक्टूबर 21, 2025

‘मनाचे श्लोक’चा वाद थांबला – आता चित्रपट नव्या नावाने ‘तू बोल ना’ म्हणून प्रदर्शित

मुंबई | कोंकणधारा सिनेमा डेस्क – १३ ऑक्टोबर २०२५ दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांच्या आगामी मराठी चित्रपट ‘मनाचे श्लोक’…

ByByEditorial अक्टूबर 15, 2025

‘कांतारा चॅप्टर 1’चा बॉक्स ऑफिसवर दणका — ‘दंगल’चाही विक्रम मोडला!

🎬 ‘कांतारा चॅप्टर 1’चा दणक्यात विकेंड — १० दिवसांत ‘दंगल’चा विक्रम मोडला! मुंबई | १३ ऑक्टोबर २०२५:दक्षिण भारतीय…

ByByEditorial अक्टूबर 12, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान