konkandhara.com

क्राईम

konkandhara 2026 05 14T020656.356

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास तेली आळी नाक्यावर घडली.अमन म्हापूसकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात राकेश गोविंद मकाने (19,रा.खालची आळी,रत्‍नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, संशयित आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्‍यांच्या 2025 मध्ये गणपती विसर्जनावेळी मांडवी येथे काही कारणावरुन वाद झाले होते. ते वादा तेव्हा सामंजस्याने सोडवण्यात आले होते.दरम्यान, सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास फिर्यादी राकेश मकाने हा त्‍याचा मित्र पार्थ ठाकूर सोबत तेली आळी नाका येथील एका दुकानात सामान खरेदी करण्यासाठी दुचाकीने गेला होता. ते दुचाकीवर बसलेल असताना संशयित अमन म्हापूसकर त्‍याठिकाणी आला त्‍याने आपल्या हातातील स्टिल धातूचे कडे काढून ते हातात पकडून फिर्यादी राकेच्या डोक्यात मागील बाजूस मारुन दुखापत केली. त्‍यानंतर त्‍याला ढकलून दिले. त्‍यावेळी पार्थ ठाकूरने त्‍यांचे भांडण सोडवले असता अमनने राकेशला तुला आता एवढेच मारले आहे तुला अजून मारेन अशी धमकी देउन निघून गेला. या मारहाणीत राकेशला दुखापत झाल्यामुळे त्‍याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल Read More »

konkandhara 2026 04 30T163754.020

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत हाणामारी झाली. अंगणात कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका वृद्ध दांपत्याला लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैमुना इस्माईल बोंदले (वय ५२) व आरोपी हे शेजारी असून त्यांच्यात गेल्या काही काळापासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. मात्र, यापूर्वी कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आली नव्हती. २८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी अर्बिना खान हिने फिर्यादीच्या अंगणात कचरा टाकला. याबाबत जाब विचारल्याने संतप्त होऊन तिने शिवीगाळ करत हातातील दगडाने मैमुना बोंदले यांच्या ओठावर प्रहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी मैमुना यांचे पती इस्माईल बोंदले घटनास्थळी आले असता, इतर सहा आरोपींनी त्यांना घेरले. त्यावेळी मन्सूर अली खान याने लाकडी काठीने इस्माईल यांच्या पाठीवर व डोक्यावर वार केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी दांपत्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी मैमुना बोंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अर्बिना खान, मन्सूर अली खान, महिल अझीम खान, जमीर खान, राहिल अझीम खान, शरीफा अली खान आणि शबाना मन्सूर खान या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५१(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा Read More »

konkandhara 2026 04 30T160009.000

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला असून, एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैध गावठी दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. आज सकाळी सुमारे ७ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान स्वरूपानंद सुभाष कदम (वय ३०, रा. शिळ कदमवाडी) याला संशयास्पद हालचाली करताना पकडले. चौकशीत तो गावठी दारू तयार करत असल्याचे उघड झाले. कारवाईत गूळ, नवसागर मिश्रित रसायन तसेच तयार दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व साहित्य नष्ट करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत पोलीस कर्मचारी दीपक साळवी, राजेंद्र सावंत, अमिता पाटील, उमेश पवार, भालचंद्र मयेकर, अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत Read More »

konkandhara 88 1

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ नारायण वाकडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो परिसरातील एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २० आणि २१ एप्रिल रोजी आडिवरे-रुंडे येथील काजू बाग परिसरात काम सुरू असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. तसेच घटनेबाबत कुणाला सांगितल्यास धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रार मिळताच नाटे (सागरी) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. शनिवारी रात्री आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास नाटे पोलीस करीत आहेत. दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत Read More »

konkandhara 73 2

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; २.३४ लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील कुंभारवाडी परिसरात भरदिवसा बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत एकूण २ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी एकनाथ साळवी (वय ४९, रा. कोळकेवाडी, कुंभारवाडी) यांच्या घरात ही घटना दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे एका चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये ठेवून कपाटात ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उघडून आत प्रवेश केला आणि पर्समधील ३९ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे २,१८,९०० रुपये), २७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत ५,५०० रुपये) तसेच १०,००० रुपये रोख असा एकूण २,३४,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय पर्समध्ये ठेवलेली पॅनकार्ड, बँक ऑफ इंडिया पासबुक, मतदान ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड आणि आधारकार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रेही चोरट्याने लंपास केली. घटना लक्षात येताच अश्विनी साळवी यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३१ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक १७/२०२६) दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी आपल्या घरांची व मौल्यवान वस्तूंची योग्य ती सुरक्षा करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; २.३४ लाखांचा ऐवज लंपास Read More »

konkandhara 24 1

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड

चिपळूण विशेष न्यायालयाचा निकाल; जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांचा निर्णय चिपळूण : चिपळूण तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय ३७, रा. चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी दिला. न्यायालयीन माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये हे प्रकरण घडले होते. घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकी दिल्यामुळे ती भीतीच्या वातावरणात राहिली होती. त्यामुळे काही काळ ही बाब उघड झाली नव्हती. काही महिन्यांनंतर मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढे पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. सुरुवातीला मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणाचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. चिपळूण पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सादर पुरावे, साक्षी आणि तपासातील कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी केला होता. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक चव्हाण यांनी काम पाहिले. या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणांत कठोर संदेश गेला असून

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड Read More »

konkandhara 92

बिजघर लाववाडीतील १५ वर्षीय मुलीचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील बिजघर लाववाडी येथे १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी बेपत्ता झाली. याबाबत तिच्या आईने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शेजारी, नातेवाईक तसेच मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. मुलगी परत येईल, अशी अपेक्षा असतानाही तिचा काहीच मागमूस न लागल्याने अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समेळ सुर्वे करीत आहेत. दरम्यान, संबंधित मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खेड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

बिजघर लाववाडीतील १५ वर्षीय मुलीचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा दाखल Read More »

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण; आरोपी आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला

राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला न्यायालयाने मोठा दणका देत वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेला चार महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्याला पोलीस देखरेखीखाली आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी कशेळी येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांना थार गाडीखाली चिरडून ठार मारल्याचा आरोप आंबेरकरवर आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल असून आंबेरकर सध्या कारागृहात आहे. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून आंबेरकरला सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपल्यानंतर त्याने पुन्हा चार महिन्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले की, आंबेरकरला उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी स्टोन आणि पित्ताशयात खडे असल्याचे आजार आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जाण्याची परवानगी व स्वखर्चाने उपचार करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाने या अर्जाला जोरदार विरोध करत आंबेरकरवर गंभीर गुन्हा दाखल असून त्याचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा फरार होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. आवश्यक उपचार पोलीस बंदोबस्तातही देता येऊ शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय अहवालानुसार आरोपीला तातडीने जामिनावर सोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. आवश्यक असल्यास पोलीस देखरेखीखाली खासगी रुग्णालयात उपचार करता येतील, असे नमूद करत न्यायालयाने आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला Read More »

माणगावातील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

माणगावमधील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित तरुणाचा शोध सुरू

​रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या लोणेरे भागात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजिंगमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, एका तरुणाने या तरुणीला लॉजवर आणले होते आणि बंद खोलीत तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिची हत्या केली. ​घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने घटनास्थळी पोहोचून सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी कायदेशीर पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत तरुणीची ओळख पटली असून, ती लोणेरे परिसरातीलच स्थानिक रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. ​तरुणीसोबत लॉजवर आलेला संशयित तरुण हा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची महत्त्वपूर्ण माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. या घटनेनंतर तो तातडीने पसार झाला. त्याला बेड्या ठोकण्यासाठी रायगड पोलिसांकडून विशेष शोधपथकांची स्थापना करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. आरोपीच्या मागावर राहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, तसेच लॉजवरील कर्मचारी व उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. ​हत्येमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रेमप्रकरणातून झालेला वाद, वैयक्तिक कारण की आणखी वेगळा उद्देश, या सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, फरार आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा स्पष्ट विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

माणगावमधील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित तरुणाचा शोध सुरू Read More »

खेडमध्ये अज्ञात वाहनाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे नवभारत हायस्कूलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री घडली. अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. लोटे-माळवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अमित फावरे हे महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेतील फावरे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कार भरधाव वेगाने चिपळूणच्या दिशेने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही तरुणांनी तत्काळ आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. खेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघात करून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू Read More »