konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला
पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण; आरोपी आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला

राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला न्यायालयाने मोठा दणका देत वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेला चार महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्याला पोलीस देखरेखीखाली आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

७ फेब्रुवारी २०२३ रोजी कशेळी येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांना थार गाडीखाली चिरडून ठार मारल्याचा आरोप आंबेरकरवर आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल असून आंबेरकर सध्या कारागृहात आहे.

दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून आंबेरकरला सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपल्यानंतर त्याने पुन्हा चार महिन्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला.

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले की, आंबेरकरला उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी स्टोन आणि पित्ताशयात खडे असल्याचे आजार आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जाण्याची परवानगी व स्वखर्चाने उपचार करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

मात्र, सरकारी पक्षाने या अर्जाला जोरदार विरोध करत आंबेरकरवर गंभीर गुन्हा दाखल असून त्याचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा फरार होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. आवश्यक उपचार पोलीस बंदोबस्तातही देता येऊ शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय अहवालानुसार आरोपीला तातडीने जामिनावर सोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. आवश्यक असल्यास पोलीस देखरेखीखाली खासगी रुग्णालयात उपचार करता येतील, असे नमूद करत न्यायालयाने आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे