konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड
Image

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड

चिपळूण विशेष न्यायालयाचा निकाल; जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांचा निर्णय

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय ३७, रा. चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी दिला.

न्यायालयीन माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये हे प्रकरण घडले होते. घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकी दिल्यामुळे ती भीतीच्या वातावरणात राहिली होती. त्यामुळे काही काळ ही बाब उघड झाली नव्हती.

काही महिन्यांनंतर मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढे पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. सुरुवातीला मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणाचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

चिपळूण पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

सादर पुरावे, साक्षी आणि तपासातील कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी केला होता. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक चव्हाण यांनी काम पाहिले.

या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणांत कठोर संदेश गेला असून

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे