konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
खेडमध्ये अज्ञात वाहनाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे नवभारत हायस्कूलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री घडली. अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. लोटे-माळवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अमित फावरे हे महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेतील फावरे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कार भरधाव वेगाने चिपळूणच्या दिशेने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही तरुणांनी तत्काळ आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

खेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघात करून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे