konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • बिजघर लाववाडीतील १५ वर्षीय मुलीचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा दाखल
Image

बिजघर लाववाडीतील १५ वर्षीय मुलीचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील बिजघर लाववाडी येथे १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी बेपत्ता झाली. याबाबत तिच्या आईने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शेजारी, नातेवाईक तसेच मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

मुलगी परत येईल, अशी अपेक्षा असतानाही तिचा काहीच मागमूस न लागल्याने अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समेळ सुर्वे करीत आहेत.

दरम्यान, संबंधित मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खेड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे