konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
Image

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास तेली आळी नाक्यावर घडली.
अमन म्हापूसकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात राकेश गोविंद मकाने (19,रा.खालची आळी,रत्‍नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, संशयित आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्‍यांच्या 2025 मध्ये गणपती विसर्जनावेळी मांडवी येथे काही कारणावरुन वाद झाले होते. ते वादा तेव्हा सामंजस्याने सोडवण्यात आले होते.
दरम्यान, सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास फिर्यादी राकेश मकाने हा त्‍याचा मित्र पार्थ ठाकूर सोबत तेली आळी नाका येथील एका दुकानात सामान खरेदी करण्यासाठी दुचाकीने गेला होता. ते दुचाकीवर बसलेल असताना संशयित अमन म्हापूसकर त्‍याठिकाणी आला त्‍याने आपल्या हातातील स्टिल धातूचे कडे काढून ते हातात पकडून फिर्यादी राकेच्या डोक्यात मागील बाजूस मारुन दुखापत केली. त्‍यानंतर त्‍याला ढकलून दिले. त्‍यावेळी पार्थ ठाकूरने त्‍यांचे भांडण सोडवले असता अमनने राकेशला तुला आता एवढेच मारले आहे तुला अजून मारेन अशी धमकी देउन निघून गेला. या मारहाणीत राकेशला दुखापत झाल्यामुळे त्‍याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Releated Posts

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; २.३४ लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील कुंभारवाडी परिसरात भरदिवसा बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान
विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे पालघर-रायगड जवळ येईल