konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
Image

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यू व इतर किटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी वर्षभर विविध जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून एडिस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे त्याचा प्रसार होतो. डेंग्यूसह इतर किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे. साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण असल्याने “आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस” ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातूनच किटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात २०२३ मध्ये डेंग्यूचे २३९ रुग्ण, २०२४ मध्ये २५६ रुग्ण, तर २०२५ मध्ये ४२ रुग्ण आढळले होते. मात्र आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे २०२६ मध्ये जानेवारीपासून आजपर्यंत केवळ ३ रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यू प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतींनी परिसर स्वच्छ ठेवणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, कायमस्वरूपी पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडणे, पाणी साठवणुकीची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून स्वच्छ करणे, तसेच प्लास्टिक, टायर व भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, अशा उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुंबलेली गटारे वाहती करणे, डबकी बुजविणे, शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे आणि गावपातळीवर जनजागृती करणे यावरही भर देण्यात आला आहे.

याशिवाय, पाणी शुद्धीकरणासाठी योग्य प्रमाणात टीसीएल पावडरचा वापर करणे, पाणी उकळून व गाळून पिणे, तसेच टायर व भंगार व्यावसायिकांनी परिसरात पावसाचे पाणी साचू न देण्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमध्ये आळीनाशकांचा वापर किंवा गप्पी मासे सोडण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून टायर, फुटकी भांडी आणि प्लास्टिक साहित्याची विल्हेवाट लावणे, तसेच शासकीय इमारती, दवाखाने, एसटी डेपो आणि रेल्वे स्थानक परिसरात डासोत्पत्ती स्थाने आहेत का याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

नागरिकांनी सहकार्य करून या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबवल्यास डास व आळी घनता कमी होऊन किटकजन्य आजारांचा उद्रेक टाळता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Releated Posts

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026

वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.

कोलाड १३ एप्रिल (शरद जाधव) रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीत डंपिंग ग्राउंड मध्ये कचरा जाळण्याचे काम करणाऱ्या…

ByByEditorial मई 13, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान
विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे पालघर-रायगड जवळ येईल