कोलाड १३ एप्रिल (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीत डंपिंग ग्राउंड मध्ये कचरा जाळण्याचे काम करणाऱ्या आदिवासी बांधवाचा मशीनचा इलेक्ट्रिक शॉक लागून दुर्दैव मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती की सोमवार दिनांक 11 मे रोजी वरसे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे निवी येथील डम्पिंग ग्राउंड वर इलेक्ट्रिक मशीन च्या सहाय्याने यातील मयत इसम अशोक वाघमारे वय 42 वर्ष राहणार चनेरा (टेपरी) हा इलेक्ट्रिक मशीन वर कचरा जाळण्याचे काम करीत होता. अचानक त्याला मशीनचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
सदर घटना ही अतिशय दुर्दैवी असून यामध्ये एका गरीब कष्टकरी आदिवासी बांधवांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर सदर घटनेची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे. सदर तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सुयेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्निल म्हात्रे सुनील सपकाळ करीत आहेत















