konkandhara.com

  • Home
  • मनोरंजन
  • “बंडखोर”चा दमदार शुभारंभ! महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली नव्या मराठी सिनेमाचा बिगुल
Image

“बंडखोर”चा दमदार शुभारंभ! महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली नव्या मराठी सिनेमाचा बिगुल

दोडामार्ग – भूषण सावंत : मराठी चित्रपटसृष्टीत नव्या जोमाने धडाकेबाज एन्ट्री करत “बंडखोर” या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगला भव्य सुरुवात झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेल्या या चित्रपटाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडले.

या सोहळ्यामुळे चित्रपटसृष्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून “बंडखोर” हा चित्रपट कथानक, अभिनय आणि मांडणीच्या जोरावर वेगळी छाप पाडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी, दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या छाया कदम, तसेच मनीष सावंत यांच्यासह तब्बल २० कलाकारांची भक्कम फौज पाहायला मिळणार आहे. विविध भूमिका आणि तगड्या व्यक्तिरेखा यामुळे चित्रपट अधिक प्रभावी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

निर्माते संजय शेट्ये यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना मोठी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे गोवा आणि परिसरातील नवोदित कलाकारांसाठी “बंडखोर” हा एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

चित्रपटाचे शूटिंग गोव्यातील निसर्गरम्य लोकेशन्सवर होणार असून, कथा आणि सादरीकरणाच्या जोरावर “बंडखोर” प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नवे प्रयोग आणि दमदार कथा घेऊन येणारा “बंडखोर” आता किती गाजतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Releated Posts

संगमेश्वरच्या साखरपा गावची तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6चे विजेतेपद पटकावले आहे.…

ByByEditorial अप्रैल 20, 2026

बॉलिवूडचे ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांचं ८४ व्या वर्षी निधन

📰 बॉलिवूडचे ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांचं ८४ व्या वर्षी निधन 📍 मुंबई | २० ऑक्टोबर २०२५:भारतीय चित्रपटसृष्टीतील…

ByByEditorial अक्टूबर 21, 2025

‘मनाचे श्लोक’चा वाद थांबला – आता चित्रपट नव्या नावाने ‘तू बोल ना’ म्हणून प्रदर्शित

मुंबई | कोंकणधारा सिनेमा डेस्क – १३ ऑक्टोबर २०२५ दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांच्या आगामी मराठी चित्रपट ‘मनाचे श्लोक’…

ByByEditorial अक्टूबर 15, 2025

‘कांतारा चॅप्टर 1’चा बॉक्स ऑफिसवर दणका — ‘दंगल’चाही विक्रम मोडला!

🎬 ‘कांतारा चॅप्टर 1’चा दणक्यात विकेंड — १० दिवसांत ‘दंगल’चा विक्रम मोडला! मुंबई | १३ ऑक्टोबर २०२५:दक्षिण भारतीय…

ByByEditorial अक्टूबर 12, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे