konkandhara.com

  • Home
  • राजकारण
  • शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का
उमेश खताते शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात; चिपळूणात ठाकरे गटाला धक्का

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले उमेश खताते यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मंगळवारी मुंबईतील ‘नंदनवन’ या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात ठाकरे गटाचे चिपळूण युवासेना प्रमुख उमेश खताते यांनी आपल्या सुमारे साडेतीनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
“उमेश खताते हे तळागाळात काम करणारे आणि लोकांच्या अडचणीच्या काळात पुढे येणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल. पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांचा पुढील राजकीय प्रवास उज्वल राहील.”

या पक्षप्रवेशावेळी उमेश खताते यांच्यासह विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती सावंत-देसाई, इकबाल बेबाल, विराज खताते, समीर कदम, मुराद चौगुले, वहाब बेबाल, सुमित भुरण, संदेश शिगवण, संतोष मिरगल, प्रफुल चाळके, अमित कांबळी, अमन कडवेकर, मुबारक सकवारे, अनिल पाटील, सचिन धांडे, लक्ष्मण शेळके, सुमेध भुरण, दीप्ती भुरण, साहिल भुरण, अखिलेश खेडेकर, रुपेश खताते, मयूर भालेकर, मंगेश भुरण, शुभम महाडिक, विशाल खताते, स्वप्नील जंगम, सुशील संगम, मंगेश गायकवाड, शुभम मिरगळ, योगेश खताते, सुमित खेडेकर, शौकत चौगुले, ओंकार जंगम, निनाद नाचरे, वेदांत कदम, सारिका कदम, शिल्पा खताते, स्वाती खताते, मनिष खताते, अनिल शिगवण, अमये शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांचे पक्षात स्वागत केले.

या सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते राजन साळवी, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Releated Posts

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

ByByEditorial अप्रैल 3, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे