konkandhara.com

  • Home
  • राजकारण
  • रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
रईस अलवी यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकट करण्यासोबतच धार्मिक तणावाला बळी न पडता सामाजिक ऐक्य अबाधित राखणे, तसेच अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढा उभारणे यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यावेळी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच पक्ष संघटनेतील विविध पदांवर नियुक्त्याही करण्यात आल्या. या बैठकीत रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या फेरनिवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यकाळाकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

या महत्वपूर्ण बैठकीस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी सहअध्यक्ष सोहेल सुभेदार, अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख अफजल फारूक, प्रदेश कार्याध्यक्ष मुजाहिद खान, वारीस पठाण, प्रदेश उपाध्यक्ष रहेमान खान पठाण, सय्यद अन्सारअली, शमीम अहमद, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, तसेच सुहास उभे, मुबिन भाई परकर, मोहसीन मुल्ला यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

ByByEditorial अप्रैल 3, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे