konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 78 1

युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आज रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले. त्यांनी रत्नागिरी शहरात राष्ट्रीय स्मारके, मंदिरांना भेट दिली. या दौऱ्यामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरवात केली. त्यानंतर पतीतपावन मंदिर, लोकमान्य टिळक स्मारकास भेट देऊन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टी कार्यालयात महाडिक यांचे आगमन ढोल ताशांच्या गजरामध्ये झाले. महिला मोर्चातर्फे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी कृष्णाराज महाडिक यांची औपचारिक ओळख करून देत कृष्णराज या नावाप्रमाणे आपण आमचे मित्र म्हणून सखा- सोबती म्हणून काम कराल, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी युवा मोर्चा अधिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने राजू भाटलेकर यांनी त्यांचे स्वागत केले. युवा मोर्चा वतीने विक्रम जैन यांनी स्वागत केले. रत्नागिरी शहर मंडल म्हणून शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, सरचिटणीस निलेश आखाडे, उपाध्यक्ष संतोष सावंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी देखील आपले मत व्यक्त करताना युवा मोर्चा सक्षम होण्यासाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून व शासकीय योजनांच्या माध्यमातून काम करणार असल्याने सांगितले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपले मत व्यक्त करताना मी तुमचा मित्र-सखा असून त्या पद्धतीनेच काम करणार आहे. तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. युवा मोर्चा जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत असून भविष्यात मी संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मोर्चा सक्षम करणार असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतातून महाडिक यांनी युवा नेतृत्वाला चांगला संदेश दिला. रत्नागिरीतील युवा उद्योजक, युट्युबर यांच्याशी सकारात्मक चर्चा करत महाडिक यांनी सर्वांचे मन जिंकले. युवा मोर्चा सक्षमीकरणासाठी कृष्णाराज महाडिक यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कोल्हापूर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा लगतचा जिल्हा असल्याने मी विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी विक्रम जैन, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, बाबा नाचणकर, निलेश आखाडे, भक्ती दळी, बाबू सुर्वे, नगरसेवक राजू तोडणकर, मानसी करमरकर, नितीन जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक, युवा मोर्चा, महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत Read More »

konkandhara 77 2

“झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान”

दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात झोळंबे शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दिमाखदार यशाबद्दल शाळेचा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान स्वीकारताना अध्यक्ष दिपक गवस उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. या यशामागे विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. झोळंबे शाळेच्या या कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान” Read More »

konkandhara 76 2

अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक.

कोलाड २५ एप्रिल(शरद जाधव) समाजात अनेक माणसे जन्माला येतात. श्रीमंत होतात .परंतु ती माणसे समाजातील गोरगरीब कष्टकरी गरजूंना किती मदतीला धावून जातात .हे महत्त्वाचे आहे. पुगाव येथील प्रमोद शेठ म्हसकर यांची सामाजिक दातृत्व नेतृत्व परोपकारवृत्ती ही गोरगरिबांसाठी तारणहार ठरली आहे. पुगाव येथील एक आदिवासी कुटुंब सुभाष वाघमारे व पत्नी सुजाता वाघमारे यांचा भीषण अपघात झाला सदर घटना प्रमोद शेठ म्हसकर यांना समजताच ते तातडीने त्यांच्या मदती करता करता धावून गेले. मदतीचा हात दिला प्रमोद शेठ यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांना खूप मोठा आधार मिळाल्याची भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. आजचा युग हे कलियुग आहे या ठिकाणी सत्ता संपत्तीची स्पर्धा आहे. कुणाला काही पडले नाही .अशा परिस्थितीत आपल्या व्यवसायातून उद्योगातून आपल्या जन्मभूमीतील बांधवांकरिता काहीतरी करता यावे हा उदात्त हेतू ठेवून प्रमोद शेठ अनंत म्हसकर प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात दिला गेला आहे. अपघात ग्रस्त कुटुंब त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे त्यांना पुढेही उपचाराची गरज आहे यावेळी प्रमोद शेठ म्हस्कर म्हणाले की सदर कुटुंब सुखरूप बरे होऊन घरी जाईल याकरता मी सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले . रायगड जिल्ह्यामध्ये प्रमोद शेठ म्हसकर नावाचं एक सामाजिक वादळ तयार झाल आहे. त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना मदतीचा हात मिळत आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्रीडा क्षेत्राला . वारकरी संप्रदायाला. भरीव अशी मदत करत आहेत या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे खूप मोठे स्वप्न आहेत. नुकताच झालेला कोलाड येथील मैत्री चषक हे प्रमोद शेठ यांच्या सामाजिक नेतृत्वाची साक्ष देऊन गेला. प्रमोद शेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी तरुणाईने रान पेटवलं होतं. प्रमोद शेठ म्हसकर सारखे नेतृत्व कोलाड सारख्या भागातून रायगडचे नेतृत्व करतील असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला. या भागातील नेते क्रिकेटच्या आवडीतूनच पुढे मोठे झाले. प्रमोद शेठ यांना सुद्धा क्रिकेट खेळाची प्रचंड आवड असल्याने त्यांचा हा क्रिकेटचा प्रवास पुढे रायगडचा राजकीय प्रवास ठरेल अशा शुभेच्छा यावेळी प्रमोद शेठ म्हसकर यांना दिल्या. प्रमोद शेठ म्हसकर यांनी सामाजिक उपक्रमातून आपल्या आई-वडिलांचे व गावचे नाव रोशन केल्याचे प्रचंड जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांवरून दिसून आले आहे.

अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक. Read More »

konkandhara 75 2

कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा.

कोलाड २४ एप्रिल (शरद जाधव) उद्योग जगतात मोठा गाजावाजा असलेल्या दर्शन कंपनीने सामाजिक बांधिलकीतून कोलाड येथील चिंचवली येथे टेकडीवर वृक्षारोपण केले होते. मात्र सदर झाडे वनव्यामध्ये जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या झाडांचे संवर्धन करण्यात सुदर्शन व्यवस्थापन या ठिकाणी फोल ठरली असून यामध्ये दोष वनव्याचा की कंपनीचा असा सवाल नागरिक करीत आहेत. सुदर्शन कंपनीकडून सुधा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात .महिलांना रोजगार म्हणून शिवण क्लास ,शैक्षणिक उपक्रम ,स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण असे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन व सुधारण्याकरता विविध उपक्रम हाती घेतले जातात.चिंचवली येथील टेकडी झाडा फुलांनी फुलवण्याचा संकल्प कंपनीने हाती घेतला होता. वृक्षारोपणाचा मोठा गाजावाजा झाला आम्ही ही टेकडी हिरवीगार करून या परिसराला हरितक्रांतीकडे नेऊ असे सांगण्यात आले .मात्र सदर झाडे दुर्लक्ष केल्याने वनव्यात जळून खाक झाली आहेत . आजूबाजूला डोंगर आहे .गवत आहे. परिसर हा वनव्याचा असताना सुदर्शन कंपनी झाडांची काळजी घेतली पाहिजे होती. त्या ठिकाणी कायमस्वरूपी कामगार एखादी चौकी हवी होती परंतु कंपनीने दुर्लक्ष केले यावरून सुदर्शन कंपनीला सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ सामाजिक उपक्रमाच्या देखाव्याच्या घाट घालायचा होता का असे बोलले जाते१९ ७२ च्या दशकात सुदर्शन सारखा कारखाना रोह्यात आला. लोकांना रोजगार मिळाला मात्र एक सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे जीवनमान किती गतिमान झाले हा चर्चेचा विषय ठरत आहे .सुदर्शन कंपनीचा उत्पादन बाबतीत बाहेरील देशात कारभार पोहचला आहे. हे कौतुकास्पद आहे. मात्र खरी सुरुवात सुदर्शन ची रोह्यातूनच सुरू झाली मात्र ते सामाजिक कामात रोहेकरांना विसरलेराठी समूहाने गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून राठी स्कूल ची स्थापना केली परंतु दर वर्षी वाढणारी फी पाहता या ठिकाणी गरीब मुलांनी शिक्षण घेऊ नये. असे राठी प्रशासनाने ठरवले की काय असे वाटू लागले आहे . सुदर्शन कंपनीचे पक्के व्यापारी धोरण आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत व राष्ट्र उभारणीत ज्यांचा मोलाचा सहभाग आहे. अशा रतन टाटा बिर्ला यांचा आदर्श घेत सुदर्शन कंपनीने स्थानिकांसाठी त्यांच्या उन्नती करता दर्जेदार काम केले पाहिजे. वनव्यात झाडे जळाली असली तरी कंपनीने ठरवले तर सदर टेकडी परत हिरवीगार होईल परंतु ती मानसिकता कंपनी दाखवणे आवश्यक आहे असे बोलले जात आहे.

कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा. Read More »

konkandhara 74 2

प्रख्यात उद्योजक रमेशशेठ रेपाळ यांचे निधन; निवळी-पालवण परिसरावर शोककळा

सावर्डे : शिवसेना नेते व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांचे कट्टर समर्थक, निवळी-पालवण येथील प्रख्यात उद्योजक रमेशशेठ शिवाजी रेपाळ यांचे दि. २४ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्षे होते. रमेशशेठ रेपाळ हे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समितीच्या माजी सदस्या संध्याताई रेपाळ यांचे पती होते. निवळी-पालवण परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे, दूरदृष्टी असलेले आणि समाजासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. श्री हनुमान सेवा मंडळ, निवळी कोष्टेवाडीचे सल्लागार, खाजगी नळ पाणी योजनेचे माजी अध्यक्ष तसेच देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ, रत्नागिरीचे सल्लागार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या निधनाने परिसराने एक कर्तृत्ववान, दिलदार आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी समाजाच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा भावना व्यक्त करत विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी पालवण येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे — सुजित व सनी उर्फ मंदार, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रख्यात उद्योजक रमेशशेठ रेपाळ यांचे निधन; निवळी-पालवण परिसरावर शोककळा Read More »

konkandhara 72 2

चिपळूणमध्ये युवा शक्ती जागर यात्रेचे जोरदार स्वागत

चिपळूण : भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त आज चिपळूण शहरात त्यांचे आगमन झाले. शहरातील बहादूरशेख नाका येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाडिक यांनी अभिवादन केले. यावेळी भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर उक्ताड (ता. चिपळूण) येथे यात्रेचे आगमन झाले असता भाजपाचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करू, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास भाजपाचे नेते वैभव खेडेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सारिका भावे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार, शहराध्यक्ष शुभम पिसे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शितल रानडे, शहराध्यक्ष रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिपळूणमध्ये युवा शक्ती जागर यात्रेचे जोरदार स्वागत Read More »

konkandhara 71 2

मातोश्रीवर दोडामार्गच्या शिवसैनिकांची दमदार हजेरी; उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार!

दोडामार्ग : भूषण सावंत : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मातोश्रीवरील महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीत दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी ठोस उपस्थिती दर्शवली. या बैठकीदरम्यान दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मणेरी विभागप्रमुख भिवा गवस आणि संघटक विजय जाधव यांनी पक्षप्रमुखांची सदिच्छा भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या भेटीत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर सखोल चर्चा झाली. दोडामार्ग तालुक्यातील संघटनात्मक घडामोडी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आगामी राजकीय रणनीती यावर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत, संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संघटनात्मक पातळीवर मोठे बदल आणि मजबुती येण्याचे संकेत मिळत आहेत. दोडामार्गच्या भूमीतून शिवसेनेचा झेंडा अधिक उंच फडकवण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मातोश्रीवर दोडामार्गच्या शिवसैनिकांची दमदार हजेरी; उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार! Read More »

konkandhara 70 3

देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन

देवरुख (प्रतिनिधी):देवरुख शहरातील चोरपऱ्या बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला मशीद या मुख्य रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष आपल्या पक्षाचे असतानाही शहर भाजपकडून नगराध्यक्ष व प्रशासनाला निवेदन देण्याची वेळ आल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून आमदार शेखर निकम यांनी 30 ऑक्टोबर रोजी हा रस्ता मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या कामासाठी सुमारे 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. नगरपंचायत निवडणुकीत जनतेने महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवले असले तरी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत नव्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित गांभीर्य दिसत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असूनही पावसाळा तोंडावर आला तरी काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी देवरुख शहरतर्फे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा सुविधा योजनेतून 17 एप्रिल रोजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र ना भूमिपूजन झाले, ना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संबंधितांनी तात्काळ अडचणी दूर करून काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष, नगरसेवक व ठेकेदार यांच्याशी संयुक्त चर्चा करून रस्ता काम सुरू करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी भाजप शिष्टमंडळाला दिल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. सदर निवेदन नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, संदीप वेलवणकर, शंकर मालप, संजय राजवाडे, राजाराम पंडित, अभिषेक निमकर, मानसी निमकर, हर्षद लिमये, चैतन्य बांडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन Read More »

konkandhara 69 2

वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम

लांजा, प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावचे ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा येत्या २८ व २९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दोन दिवसीय या सोहळ्यानिमित्त संपूर्ण गाव भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, २८ एप्रिल रोजी सकाळी लहान मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत श्री गणेश वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ, कुर्णे यांची सुमधुर भजनसेवा रंगणार असून भाविकांना भक्तिरसाचा आनंद लुटता येणार आहे. रात्री ९ वाजता लहान मुलांचे नृत्य सादरीकरण होणार असून त्यानंतर लकी ड्रॉ व बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी, २९ एप्रिल रोजी सकाळी मूर्ती अभिषेक व सत्यनारायण पूजा होईल. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५.३० ते ६.३० मान्यवरांचा स्वागत समारंभ, तर ७.३० ते ८.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा (भोवत्या) होणार आहेत. रात्री १०.३० वाजता सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे ‘अकल्पित’ हे हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक. हरीश सामंत लिखित आणि राजू मांडवकर दिग्दर्शित या नाटकात सुरज चव्हाण, दत्ताराम चव्हाण, राजन सुर्वे, सुरेंद्र चव्हाण आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कु. साक्षी कदम यांचा दमदार अभिनय रसिकांना अनुभवता येणार आहे. गावप्रमुख, सर्व मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून तयारीसाठी ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली आहे. या भक्तिमय आणि मनोरंजनमय सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम Read More »

konkandhara 68 2

अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान

चिपळूण /प्रतिनिधी : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने डेरवण परिसराला जोरदार तडाखा बसला. या वादळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. वादळासोबत आलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे घरावरील कौलारू पत्रे सुमारे २० ते २५ फूट अंतरावर उडून रस्त्यावर पडली. त्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान Read More »