konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
Image

पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन

दोडामार्ग : भूषण सावंत: जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी पावसात वारंवार खंडित होणारी वीज सेवा, तासन्तास अंधारात राहणारी गावे, दुरुस्तीला होणारा विलंब तसेच ग्राहकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी पावसाळ्यात वीज विभाग सक्षमपणे सेवा देऊ शकेल का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य विज ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कुडाळ येथील जिल्हा अधीक्षक अभियंता कार्यालयात जाब विचारणा आंदोलन छेडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तमाम विज ग्राहकांनी आपल्या लेखी तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर आणि सोशल मीडिया प्रमुख मनोज घाटकर यांनी केले आहे.

“पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज यंत्रणा कोलमडत असेल तर मुसळधार पावसात परिस्थिती किती बिकट होईल, याची कल्पना न केलेली बरी,” असा आक्रमक इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. वारंवार होणारे वीज खंडित प्रकार, झाडांच्या फांद्या न छाटणे, जुनाट तारांमुळे उद्भवणारे धोके, ग्रामीण भागातील दुर्लक्षित सेवा आणि ग्राहकांना मिळणारी असमाधानकारक वागणूक याबाबत प्रशासनाला थेट जाब विचारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आता शांत न बसता आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.