konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मातोश्रीवर दोडामार्गच्या शिवसैनिकांची दमदार हजेरी; उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार!
Image

मातोश्रीवर दोडामार्गच्या शिवसैनिकांची दमदार हजेरी; उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार!

दोडामार्ग : भूषण सावंत : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मातोश्रीवरील महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीत दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी ठोस उपस्थिती दर्शवली. या बैठकीदरम्यान दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मणेरी विभागप्रमुख भिवा गवस आणि संघटक विजय जाधव यांनी पक्षप्रमुखांची सदिच्छा भेट घेतली.

मातोश्रीवर झालेल्या या भेटीत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर सखोल चर्चा झाली. दोडामार्ग तालुक्यातील संघटनात्मक घडामोडी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आगामी राजकीय रणनीती यावर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत, संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

या भेटीमुळे दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संघटनात्मक पातळीवर मोठे बदल आणि मजबुती येण्याचे संकेत मिळत आहेत.

दोडामार्गच्या भूमीतून शिवसेनेचा झेंडा अधिक उंच फडकवण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Releated Posts

चिपळूणमध्ये युवा शक्ती जागर यात्रेचे जोरदार स्वागत

चिपळूण : भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त आज चिपळूण शहरात त्यांचे…

ByByEditorial अप्रैल 24, 2026

देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन

देवरुख (प्रतिनिधी):देवरुख शहरातील चोरपऱ्या बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला मशीद या मुख्य रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये…

ByByEditorial अप्रैल 24, 2026

वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम

लांजा, प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावचे ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा येत्या २८…

ByByEditorial अप्रैल 24, 2026

अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान

चिपळूण /प्रतिनिधी : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने डेरवण परिसराला जोरदार तडाखा बसला. या वादळात शिवसेना…

ByByEditorial अप्रैल 24, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

चिपळूणमध्ये युवा शक्ती जागर यात्रेचे जोरदार स्वागत
देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन
वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम
अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान
चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’
बंगाल मधील मतदान लोकशाहीचा हुंकार की व्यवस्थेच्या क्रूरतेविरुद्धचा एल्गार?
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर
मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल
टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या