konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन
Image

देवरुख न.प.तील मुख्य रस्त्याचे काम रखडले; शहर भाजपकडून प्रशासनाला निवेदन

देवरुख (प्रतिनिधी):
देवरुख शहरातील चोरपऱ्या बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला मशीद या मुख्य रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष आपल्या पक्षाचे असतानाही शहर भाजपकडून नगराध्यक्ष व प्रशासनाला निवेदन देण्याची वेळ आल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून आमदार शेखर निकम यांनी 30 ऑक्टोबर रोजी हा रस्ता मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या कामासाठी सुमारे 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. नगरपंचायत निवडणुकीत जनतेने महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवले असले तरी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत नव्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित गांभीर्य दिसत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असूनही पावसाळा तोंडावर आला तरी काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी देवरुख शहरतर्फे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा सुविधा योजनेतून 17 एप्रिल रोजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र ना भूमिपूजन झाले, ना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संबंधितांनी तात्काळ अडचणी दूर करून काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष, नगरसेवक व ठेकेदार यांच्याशी संयुक्त चर्चा करून रस्ता काम सुरू करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी भाजप शिष्टमंडळाला दिल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली.

सदर निवेदन नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, संदीप वेलवणकर, शंकर मालप, संजय राजवाडे, राजाराम पंडित, अभिषेक निमकर, मानसी निमकर, हर्षद लिमये, चैतन्य बांडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे