konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा.
Image

कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा.

कोलाड २४ एप्रिल (शरद जाधव)

उद्योग जगतात मोठा गाजावाजा असलेल्या दर्शन कंपनीने सामाजिक बांधिलकीतून कोलाड येथील चिंचवली येथे टेकडीवर वृक्षारोपण केले होते. मात्र सदर झाडे वनव्यामध्ये जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या झाडांचे संवर्धन करण्यात सुदर्शन व्यवस्थापन या ठिकाणी फोल ठरली असून यामध्ये दोष वनव्याचा की कंपनीचा असा सवाल नागरिक करीत आहेत.

सुदर्शन कंपनीकडून सुधा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात .महिलांना रोजगार म्हणून शिवण क्लास ,शैक्षणिक उपक्रम ,स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण असे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन व सुधारण्याकरता विविध उपक्रम हाती घेतले जातात.
चिंचवली येथील टेकडी झाडा फुलांनी फुलवण्याचा संकल्प कंपनीने हाती घेतला होता. वृक्षारोपणाचा मोठा गाजावाजा झाला आम्ही ही टेकडी हिरवीगार करून या परिसराला हरितक्रांतीकडे नेऊ असे सांगण्यात आले .मात्र सदर झाडे दुर्लक्ष केल्याने वनव्यात जळून खाक झाली आहेत .

आजूबाजूला डोंगर आहे .गवत आहे. परिसर हा वनव्याचा असताना सुदर्शन कंपनी झाडांची काळजी घेतली पाहिजे होती. त्या ठिकाणी कायमस्वरूपी कामगार एखादी चौकी हवी होती परंतु कंपनीने दुर्लक्ष केले यावरून सुदर्शन कंपनीला सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ सामाजिक उपक्रमाच्या देखाव्याच्या घाट घालायचा होता का असे बोलले जाते
१९ ७२ च्या दशकात सुदर्शन सारखा कारखाना रोह्यात आला. लोकांना रोजगार मिळाला मात्र एक सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे जीवनमान किती गतिमान झाले हा चर्चेचा विषय ठरत आहे .सुदर्शन कंपनीचा उत्पादन बाबतीत बाहेरील देशात कारभार पोहचला आहे. हे कौतुकास्पद आहे. मात्र खरी सुरुवात सुदर्शन ची रोह्यातूनच सुरू झाली मात्र ते सामाजिक कामात रोहेकरांना विसरले
राठी समूहाने गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून राठी स्कूल ची स्थापना केली परंतु दर वर्षी वाढणारी फी पाहता या ठिकाणी गरीब मुलांनी शिक्षण घेऊ नये. असे राठी प्रशासनाने ठरवले की काय असे वाटू लागले आहे .

सुदर्शन कंपनीचे पक्के व्यापारी धोरण आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत व राष्ट्र उभारणीत ज्यांचा मोलाचा सहभाग आहे. अशा रतन टाटा बिर्ला यांचा आदर्श घेत सुदर्शन कंपनीने स्थानिकांसाठी त्यांच्या उन्नती करता दर्जेदार काम केले पाहिजे. वनव्यात झाडे जळाली असली तरी कंपनीने ठरवले तर सदर टेकडी परत हिरवीगार होईल परंतु ती मानसिकता कंपनी दाखवणे आवश्यक आहे असे बोलले जात आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे