konkandhara.com

Image

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव)

पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जय बजरंग रोहा खो-खो संघाचा कु. अनुराज योगेश ठाकूर याची सोलापूर येथे होणाऱ्या ५२ व्या महाराष्ट्र राज्य कुमार गट अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुमार गट संघात निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अनुराजची सलग दुसऱ्या वर्षी रायगड जिल्हा संघात निवड झाली असून मागील वर्षी देखील त्याने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. सातत्यपूर्ण सराव, मेहनत, फिटनेस आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा जिल्हा संघात आपले स्थान कायम राखले आहे.

जय बजरंग रोहा खो-खो संघ यांच्या माध्यमातून अनुराजने अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या यशामध्ये त्याचे वडील आणि परिवाराचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जात आहे. कुस्ती खेळाचा वारसा असल्यामुळे क्रीडाविषयक आवड त्याच्यामध्ये लहानपणापासून होती.

या निवडीबद्दल जय बजरंग क्रीडा मंडळ रोहा तसेच परिसरातील क्रीडाप्रेमींनी अनुराज योगेश ठाकूर याचे अभिनंदन केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026

पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन

दोडामार्ग : भूषण सावंत: जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.