konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम
Image

वेसुर्ले ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळाभक्ती, संस्कृती आणि ‘अकल्पित’ नाटकाचा अप्रतिम संगम

लांजा, प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील वेसुर्ले गावचे ग्रामदैवत श्री देव चपोबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा येत्या २८ व २९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दोन दिवसीय या सोहळ्यानिमित्त संपूर्ण गाव भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरणाने न्हाऊन निघणार आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, २८ एप्रिल रोजी सकाळी लहान मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत श्री गणेश वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ, कुर्णे यांची सुमधुर भजनसेवा रंगणार असून भाविकांना भक्तिरसाचा आनंद लुटता येणार आहे.

रात्री ९ वाजता लहान मुलांचे नृत्य सादरीकरण होणार असून त्यानंतर लकी ड्रॉ व बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.

दुसऱ्या दिवशी, २९ एप्रिल रोजी सकाळी मूर्ती अभिषेक व सत्यनारायण पूजा होईल. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५.३० ते ६.३० मान्यवरांचा स्वागत समारंभ, तर ७.३० ते ८.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा (भोवत्या) होणार आहेत.

रात्री १०.३० वाजता सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे ‘अकल्पित’ हे हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक. हरीश सामंत लिखित आणि राजू मांडवकर दिग्दर्शित या नाटकात सुरज चव्हाण, दत्ताराम चव्हाण, राजन सुर्वे, सुरेंद्र चव्हाण आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कु. साक्षी कदम यांचा दमदार अभिनय रसिकांना अनुभवता येणार आहे.

गावप्रमुख, सर्व मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून तयारीसाठी ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली आहे. या भक्तिमय आणि मनोरंजनमय सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे