konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक.
Image

अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक.

कोलाड २५ एप्रिल(शरद जाधव)

समाजात अनेक माणसे जन्माला येतात. श्रीमंत होतात .परंतु ती माणसे समाजातील गोरगरीब कष्टकरी गरजूंना किती मदतीला धावून जातात .हे महत्त्वाचे आहे. पुगाव येथील प्रमोद शेठ म्हसकर यांची सामाजिक दातृत्व नेतृत्व परोपकारवृत्ती ही गोरगरिबांसाठी तारणहार ठरली आहे.

पुगाव येथील एक आदिवासी कुटुंब सुभाष वाघमारे व पत्नी सुजाता वाघमारे यांचा भीषण अपघात झाला सदर घटना प्रमोद शेठ म्हसकर यांना समजताच ते तातडीने त्यांच्या मदती करता करता धावून गेले. मदतीचा हात दिला प्रमोद शेठ यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांना खूप मोठा आधार मिळाल्याची भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केली.

आजचा युग हे कलियुग आहे या ठिकाणी सत्ता संपत्तीची स्पर्धा आहे. कुणाला काही पडले नाही .अशा परिस्थितीत आपल्या व्यवसायातून उद्योगातून आपल्या जन्मभूमीतील बांधवांकरिता काहीतरी करता यावे हा उदात्त हेतू ठेवून प्रमोद शेठ अनंत म्हसकर प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात दिला गेला आहे. अपघात ग्रस्त कुटुंब त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे त्यांना पुढेही उपचाराची गरज आहे यावेळी प्रमोद शेठ म्हस्कर म्हणाले की सदर कुटुंब सुखरूप बरे होऊन घरी जाईल याकरता मी सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले .

रायगड जिल्ह्यामध्ये प्रमोद शेठ म्हसकर नावाचं एक सामाजिक वादळ तयार झाल आहे. त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना मदतीचा हात मिळत आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्रीडा क्षेत्राला . वारकरी संप्रदायाला. भरीव अशी मदत करत आहेत या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे खूप मोठे स्वप्न आहेत. नुकताच झालेला कोलाड येथील मैत्री चषक हे प्रमोद शेठ यांच्या सामाजिक नेतृत्वाची साक्ष देऊन गेला.

प्रमोद शेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी तरुणाईने रान पेटवलं होतं. प्रमोद शेठ म्हसकर सारखे नेतृत्व कोलाड सारख्या भागातून रायगडचे नेतृत्व करतील असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला. या भागातील नेते क्रिकेटच्या आवडीतूनच पुढे मोठे झाले. प्रमोद शेठ यांना सुद्धा क्रिकेट खेळाची प्रचंड आवड असल्याने त्यांचा हा क्रिकेटचा प्रवास पुढे रायगडचा राजकीय प्रवास ठरेल अशा शुभेच्छा यावेळी प्रमोद शेठ म्हसकर यांना दिल्या. प्रमोद शेठ म्हसकर यांनी सामाजिक उपक्रमातून आपल्या आई-वडिलांचे व गावचे नाव रोशन केल्याचे प्रचंड जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांवरून दिसून आले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे