चिपळूण : कळमुंडी गावातील “माझी लाडकी बहीण योजना” लाभार्थी महिलांना गेल्या सहा महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमधून पैसे मिळत नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत युवासेना तालुका प्रमुख श्री. प्रितम नंदकुमार वंजारे यांनी आज मार्गताम्हाणे पोस्ट ऑफिसला निवेदन देत तात्काळ तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी केली.
महिलांची गैरसोय त्वरित दूर करावी, अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.















