konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दशावतार कलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणारा युवा कलाकार कृष्णा लाड सन्मानित
Image

दशावतार कलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणारा युवा कलाकार कृष्णा लाड सन्मानित

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजय पिळणकर

सावंतवाडी, ता. २३ : सिंधुदुर्गच्या समृद्ध दशावतार कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे अभ्यासू युवा कलाकार कृष्णा उर्फ साहिल शंकर लाड यांना “राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद गोवा-महाराष्ट्र राज्य २०२६” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान पणजी येथील कला व संस्कृती भवन येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, गोवा आमदार रॉडॉल्फो फर्नांडिस, निवृत्त प्राध्यापक उल्हास प्रभू देसाई तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेते अभय खडपकर यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

साहिल लाड गेली १४ वर्षे दशावतार कलेत सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात शालेय जीवनात, इयत्ता चौथीत असतानाच झाली. लहानपणी आई-वडिलांनी आवर्जून नाटक पाहायला नेल्याने त्यांच्या मनावर या कलेचे संस्कार झाले. त्यामुळेच ते आपल्या आई-वडिलांना आपले पहिले गुरू मानतात.

आजवर त्यांनी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ (मुंबई), खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली), बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ (दोडामार्ग), मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ (मोचेमाड) तसेच रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ (हुमरस) अशा विविध नामांकित नाट्यमंडळांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या ते जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस-दांडेली (सावंतवाडी) येथे कार्यरत आहेत.

या क्षेत्रात कार्य करताना त्यांना शंकर पिळणकर, गोविंद मराठे, विनोद घोणे, शंकर मेस्त्री, गणपत मांजरेकर, विलास गावस, गौरव शिर्के, दादा राणे, सिद्धार्थ मेस्त्री, ज्ञानेश्वर नाईक आणि नारायण आशियेकर यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पंढरी घाटकर, चारुदास मांजरेकर, प्रथमेश मेस्त्री आणि रमेश शिरोडकर यांच्या भूमिकांना आदर्श मानून व प्रेरणा घेत त्यांनी आपली अभिनय शैली अधिक परिपक्व केली.

या राष्ट्रीय सन्मानाचे संपूर्ण श्रेय त्यांनी ज्येष्ठ कलाकार दादा राणे यांना दिले असून, त्यांच्या या यशामुळे हुमरस गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने दशावतार कलेला नवी उंची मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे