konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा राजकीय डाव : भास्कर जाधव
Image

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा राजकीय डाव : भास्कर जाधव

चिपळूण: नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून केंद्र सरकार देशात राजकीय अजेंडा राबवत असून, मोठ्या राज्यांतील खासदारांची संख्या वाढवून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला. विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध नसून केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षणाच्या विषयावर पत्रकार, विविध राजकीय पदाधिकारी तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

जाधव म्हणाले, केंद्र सरकारने १६ ते १८ एप्रिलदरम्यान तीन कायदे मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले होते. मात्र विरोधात २४८ खासदारांनी मतदान केल्याने ती विधेयके फेटाळण्यात आली. नारीशक्ती वंदन विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नसून, त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या पाच दिवसीय अधिवेशनात महिला आरक्षणाच्या बाजूने ४५२ मते पडली होती, तर विरोधात केवळ दोन मते होती. त्यामुळे विरोधक महिला आरक्षणाच्या विरोधात असल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक पुन्हा पुढे आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

खासदारांची संख्या ५४३ वरून ८५० करण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मतदारसंघ निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसून तो निवडणूक आयोगाचा आहे. मात्र स्वायत्त संस्थांवर सरकारचा प्रभाव वाढल्याचाही आरोप त्यांनी केला.

ठरावीक मोठ्या राज्यांना खूश ठेवून त्यांच्या बळावर पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचेही जाधव यांनी नमूद केले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे