konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’
Image

चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’

आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; विविध संस्थांची मागणी

चिपळूण, प्रतिनिधी : चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कला दालनास ‘निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन’ असे नाव देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विविध सामाजिक संस्थांनी याबाबत आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. आमदार निकम यांनी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महसूल व वन विभागाने ही मान्यता दिली.

रत्नागिरी जिल्हा वन विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चिपळूण येथील वन विभाग संकुलात आकर्षक व अभ्यासपूर्ण कलादालन उभारण्यात आले आहे. या कलादालनाची संकल्पना, आराखडा आणि मूळ मांडणी तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक स्वर्गीय निलेश विलास बापट यांची होती.

स्व. बापट यांनी निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव आणि जैवविविधता संरक्षणासाठी आयुष्य वाहिले होते. ‘सह्याद्री निसर्गमित्र’, ‘ग्लोबल चिपळूण’ आणि ‘आरोही’ या संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच विविध अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण आणि वन्यजीव बचाव मोहिमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, रंजिता फाउंडेशन, नवकोकण एज्युकेशन सोसायटी, सह्याद्री निसर्गमित्र, नगरसेवक निहार कोवळे आणि परिवर्तन संस्था यांनी या कलादालनास स्व. बापट यांचे नाव देण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर वन विभागाने प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्यास मंजुरी दिली असून विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांचीही या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

या निर्णयाबद्दल चिपळूणवासीयांनी समाधान व्यक्त केले असून विविध संस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.

 

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे