konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल
Image

मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी


मित्राने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी विकून तसेच एक अंगठी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्याचे तब्बल 1 लाख 55 हजार रुपये लाटेल. याप्रकरणी संशयित मित्राविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 29 मार्च रोजी सकाळी 11 ते 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.कालावधीत शहरातील आरोग्य मंदिर व मारुती मंदिर येथे परिसरात घडली आहे.
प्रथम जयेश खानविलकर (23,मुळ रा.राजीवडा सध्या रा.शांतीनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मित्राचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रसाद रविंद्र पोकळे (25,रा.मारुती मंदिर,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तकार दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही मित्र आहेत. 29 मार्च 2026 रोजी प्रसाद पोकळेने त्याच्या वडिलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या त्याचा मित्र प्रथम खानविलकर याच्याकडे अधिकचे सोने घालून काम करुन आणण्यासाठी विश्वासाने दिल्या होत्या. परंतू प्रथम खानविलकरने त्यातील एक अंगठी सोनाराला विकली. तसेच दूसरी अंगठी ही मुथ्थूट फायनान्स कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले. अशाप्रकारे दोन्ही अंगठ्यांवर त्याने एकूण 1 लाख 55 हजार रुपये घेउन स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. दरम्यान, 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वा.सुमारास प्रसादने प्रथमकडे दोन्ही अंगठ्यांची मागणी केली. तेव्हा प्रथमने त्याला मी तुला कोणतेही पैसे देणार नाही, ना अंगठ्या देणार. जास्त त्रास दिलास तर तुझे हातपाय तोडून तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे