konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रत्नागिरीत माणुसकीचे दर्शन: रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी रिक्षाचालक बनला ‘देवदूत’
Image

रत्नागिरीत माणुसकीचे दर्शन: रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी रिक्षाचालक बनला ‘देवदूत’

माणुसकीचा जिवंत प्रत्यय: चांदसूर्या स्टॉपजवळ अपघात; रिक्षाचालक आदित्य पावसकर यांची तत्परता ठरली जीवदान देणारी


रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील चांदसूर्या स्टॉपजवळ गुरुवार, 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास झालेल्या वाहन अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मात्र, प्रसंगावधान राखत रिक्षाचालकांनी दाखविलेल्या धाडस आणि तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.
जयसूर्या शांताराम मांडवकर (वय 38, रा. कापडगाव) हे अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र, या गंभीर परिस्थितीत वेळ न दवडता रिक्षाचालक आदित्य अनंत पावसकर (रा. गावडे आंबोरे) यांनी माणुसकीचा परिचय देत तातडीने पुढाकार घेतला. पावसकर हे आपल्या रिक्षाचे पासिंग काम आटोपून रत्नागिरीत परतत होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी मांडवकर यांना आपल्या रिक्षामध्ये घेतले. यावेळी रुपेश पालकर (रा. पाली) यांनीही तत्पर सहकार्य करत आपली दुचाकी तिथेच उभी करून रिक्षामधून जखमी मांडवकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी मांडवकर यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.आदित्य पावसकर या रिक्षाचालकानी दाखविलेल्या धाडसी आणि मानवतावादी कृतीमुळे रत्नागिरीत त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे