konkandhara.com

21 अप्रैल 2026

१३ वर्षीय रिया ठसाळेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिनमध्ये यश

लहान वयात मोठी भरारी – रिया ठसाळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे झेपावली

चिपळूण : कोकणच्या मातीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान खेळाडू रिया स्नेहा सचिन ठसाळे हिने जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन या खेळात आपली चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. केवळ १३ वर्षे वय असलेल्या रियाने आपल्या मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत आता भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. दि. १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी चेन्नई (तमिळनाडू) येथील हॉल ऑफ जिमनॅस्टिक येथे ७वी ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप तसेच २री आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातून अनेक गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत रियाने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत तिसरे स्थान पटकावले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. या यशामुळे रिया आता चीनमधील हॉंगकॉंग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या क्रीडा कारकिर्दीतील हे अत्यंत महत्त्वाचे आणि अभिमानास्पद पाऊल मानले जात आहे. रिया ही चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावची असून सध्या मुंबईतील नायगाव-दादर (पूर्व) येथे वास्तव्यास आहे. ती IES V. N. Sule Guruji English Medium Secondary School, दादर हिंदू कॉलनी येथे शिक्षण घेत आहे. लहान वयातच खेळाबद्दल निर्माण झालेली आवड, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे तिचे आई-वडील स्नेहा ठसाळे आणि सचिन ठसाळे यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच पॉवर जम्प स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षिका शिवानी दौड मॅडम आणि शेफाली मॅडम यांचे मार्गदर्शनही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. योग्य प्रशिक्षण, कुटुंबाचा पाठिंबा आणि तिची जिद्द यामुळे रियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा मार्ग खुला केला आहे. रिया ठसाळेच्या या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार, कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांकडून तिचे मनापासून कौतुक करण्यात येत आहे. भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा ठाम विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

लहान वयात मोठी भरारी – रिया ठसाळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे झेपावली Read More »

कोकणातील इनामी देवस्थान जमिनींसाठी नवीन कायदा अंतिम टप्प्यात; मसुदा लवकरच

कोकणातील इनामी देवस्थान जमिनींसाठी स्वतंत्र कायदा अंतिम टप्प्यात

मसुदा १५ दिवसांत शासन पोर्टलवर; अधिवेशनात मांडण्याची तयारीआमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने मंत्रालयात विशेष बैठक मुंबई : कोकणातील इनामी देवस्थान जमिनींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र व सुस्पष्ट तरतुदी असलेला नवीन कायदा आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत या कायद्याचा मसुदा शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करून संबंधितांकडून हरकती व अभिप्राय मागवले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात मंगळवारी शेखर निकम यांच्या मागणीनुसार आयोजित विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.बैठकीस महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पेढे-परशुराम येथील ग्रामस्थ उपस्थित होते. पेढे-परशुराम येथील इनामी देवस्थान जमिनींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी बैठकीत ठाम भूमिका मांडत सांगितले की, अनेक शेतकरी व कुळे पिढ्यान् पिढ्या जमीन कसत असले तरी त्यांच्या नावावर मालकी नोंद नसल्याने कर्ज, अनुदान, पीकविमा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावेळी शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष सुनील गमरे, उपाध्यक्ष गजानन भोसले, सचिव अमोल वारे, संघटक प्रमोद माळी आदी उपस्थित होते.या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, देवस्थान जमिनी कुळांच्या नावाने करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणण्यात येणार आहे. मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून सुधारित विधेयक आगामी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाईल. तसेच पेढे-परशुराम गावातील जमिनींसंदर्भातील सर्व आदेश व अभिलेख तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील इतर महसुली प्रश्नांवरही चर्चा झाली. जिल्ह्यात आंबा, काजू यांसारख्या फळबागांची संख्या मोठी आहे. नेटवर्कअभावी दरवर्षी ई-पीक पाहणी करणे बागायतदारांसाठी गैरसोयीचे ठरत असल्याची बाब आमदार निकम यांनी मांडली. यावर मंत्री बावनकुळे यांनी जमाबंदी आयुक्त, पुणे तसेच कृषी आयुक्त, पुणे यांनी फळपिकांच्या वयोमर्यादेचा विचार करून ई-पीक पाहणी दरवर्षीऐवजी तीन वर्षांतून एकदा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश दिले. जिल्ह्यातील रोपवाटिकांना लागणाऱ्या मातीवर महसूल खात्याकडून रॉयल्टी व दंड आकारला जात असल्याने रोपवाटिकाधारक आणि शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही आमदार निकम यांनी उपस्थित केला. यावर मंत्री बावनकुळे यांनी रोपवाटिकांसाठी लागणारी माती विना रॉयल्टी व विना दंड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष धोरण आखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आदेश दिले. कोकणातील शेतकरी, कुळे आणि बागायतदारांच्या दृष्टीने या बैठकीतील निर्णयांना महत्त्व प्राप्त झाले असून, इनामी देवस्थान जमिनींच्या प्रश्नावर लवकरच ठोस तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोकणातील इनामी देवस्थान जमिनींसाठी स्वतंत्र कायदा अंतिम टप्प्यात Read More »

konkandhara 88

चिपळूणमध्ये महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत शहरातील अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. माजी सभापती पूजा निकम यांनी नवप्रवेशित महिलांचे संपर्क कार्यालयात स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. रहिमत जबले यांच्या पुढाकारातून हा प्रवेश पार पडला. शहर महिला अध्यक्ष आदिती देशपांडे यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करून पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनीषा जोगले, नेत्रा जोगले, दीप्ती भुवड, सेजल जोगले, ममता शेडगे, अनिता गुढेकर, शुभांगी घाडगे, सुहासिनी शेडगे, अकीला शहा, फरहाना शेख, रईसा कास्कर, रिजवाना सय्यद, फातिमा झारे, रुबिना कास्कर, चंद्रभागा घडशी, प्रांजली शीतप आणि नम्रता भुवड यांनी पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पूजताई निकम, नगरसेविका शहनाज वांगडे, महिला प्रदेश प्रतिनिधी दिशा दाभोळकर, महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, शहराध्यक्ष आदिती देशपांडे तसेच रवीना गुजर, मनाली जाधव, पुनम भोजने, रहेमत जबले, मीरा नारकर, निहालिका तांबडे आदी उपस्थित होते. नवप्रवेशित महिलांनी हा निर्णय केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे सांगितले. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिपळूणमध्ये महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

konkandhara 87

“तापमान मोजायला यंत्रच नाही ; शेतकऱ्यांचा जीव कसा वाचवणार ?” — जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा उष्णतेचा मोठा फटका बसत असताना, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. मार्च महिन्यात तापमानाने ३७ अंशांचा टप्पा ओलांडला, मात्र जिल्ह्यातील अनेक भागांत तापमान नोंदविण्यासाठी आवश्यक यंत्रणाच नसल्याने प्रत्यक्ष परिस्थितीची नोंदच होत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना होणारे नुकसान शासनापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, नुकसानभरपाईपासूनही शेतकरी वंचित राहत आहेत. “तक्रारी करूनही प्रशासन झोपेतच आहे का ?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असताना, फळपिकांवर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. आंबा व काजू पिकांची मोठ्या प्रमाणावर गळती होत असून, अनेक ठिकाणी फळधारणा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही अधिकृत तापमान नोंदीअभावी या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. शासनाने फळपिक विमा योजना लागू केली असली तरी, त्यातील तांत्रिक अडचणी व निकषांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही. विमा कंपन्या व शासन यांच्यातील विसंगतीमुळे नुकसानभरपाई वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. “तापमान नोंदविण्याची यंत्रणा तात्काळ बसवावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी आणि विमा योजनेतील त्रुटी दूर कराव्यात,” अशी ठाम मागणी वेंगुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष व शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 👉 निष्क्रिय प्रशासनामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतलेली परिस्थिती आता किती दिवस सहन करायची ?

“तापमान मोजायला यंत्रच नाही ; शेतकऱ्यांचा जीव कसा वाचवणार ?” — जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल Read More »

राजापूरात WhatsApp लिंकद्वारे ऑनलाईन फसवणूक; ₹3 लाख लंपास

राजापूरात ऑनलाईन फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार

व्हॉटअप लिंकद्वारे ३ लाखाची फसवणूक राजापूर : राजापूर शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने सुमारे तीन लाख रुपये लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी राजापूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकाला मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीकडून वाट्सअप च्या माध्यमातून एक फसवी लिंक पाठविण्यात आली. ती लिंक त्यांनी ओपन केली आणि काही मिनिटात त्यांच्या खात्यातील तब्बल तीन लाख रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या प्रतिष्ठित नागरिकाने तात्काळ राजापूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. दरम्यान ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असून त्याबाबत जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.

राजापूरात ऑनलाईन फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार Read More »

कळंबणीत भरधाव फॉर्च्युनरची हॉटेल व घराला धडक; मोठे नुकसान, जीवितहानी टळली

कळंबणी येथे भरधाव फॉर्च्युनरची हॉटेल व घराला जोरदार धडक

खेड (प्रतिनिधी): मुंबई–गोवा महामार्गावरील कळंबणी परिसरात आज एक भीषण अपघात घडला असून, भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनर कारने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिली. हा अपघात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोरच घडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर कार मुंबईच्या दिशेने जात होती. कळंबणी परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल व घरात घुसली. ही धडक इतकी जोरदार होती की हॉटेलच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून आतील साहित्यही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. घरालाही धक्का बसल्याने मोठी हानी झाली आहे. ज्या वेळी हा अपघात घडला, त्या वेळी हॉटेल किंवा परिसरात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली असून स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा जोरदार आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा सुरू केला आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वेग आणि नियंत्रण सुटणे हे कारण असल्याचे बोलले जात आहे. मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी मोठ्या आर्थिक नुकसानीची नोंद झाली आहे.

कळंबणी येथे भरधाव फॉर्च्युनरची हॉटेल व घराला जोरदार धडक Read More »

मळगाव रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाची मागणी

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर

​मळगाव / भूषण सावंत : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात असून, येथे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे.​वेळेचा प्रचंड अपव्यय​रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर साधारणतः १५ ते २० मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. सावंतवाडी रोड स्थानकावर गाड्यांची ये-जा मोठी असल्याने दिवसातून अनेकवेळा हे फाटक बंद असते. परिणामी, फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला या विलंबाचा मोठा फटका बसत आहे. ​पर्यायी मार्ग असूनही अडचण ​या फाटकाला रेल्वे स्थानकामार्फत एक पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. मात्र, हा रस्ता रेल्वे स्थानकाला सुमारे २ किलोमीटरचा वळसा घालून जातो. वाढते इंधन दर आणि अतिरिक्त अंतरामुळे वाहनधारक या वळसा मार्गापेक्षा फाटकावर थांबणे पसंत करतात. मात्र, यामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे.​प्रशासकीय दुर्लक्षामुळे संताप​वाहनधारकांच्या मते, सावंतवाडी-शिरोडा हा मार्ग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. फाटकामुळे होणारी ही कोंडी सोडवण्यासाठी येथे उड्डाणपूल (Flyover) बांधणे हाच एकमेव ठोस उपाय आहे.​”रेल्वे प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समन्वयाने उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, जेणेकरून प्रवाशांची इंधन आणि वेळेची बचत होईल,” अशी भावना स्थानिक वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.​आता या ज्वलंत प्रश्नावर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर Read More »

‘ऐका ना…’ फेम स्वानंदी सरदेसाई लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साधा विवाह

‘ऐका ना…’ म्हणणारी स्वानंदी सरदेसाई लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साध्या पद्धतीने विवाह

मुंबई : सोशल मीडियावर “ऐका ना…” अशी साद घालत आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि गायिका स्वानंदी सरदेसाई हिने लग्नगाठ बांधली आहे. रविवारी, 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिचा विवाह पार पडला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘दशावतार’ फेम असलेल्या स्वानंदीने कोणताही दिखाऊपणा न करता अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. तिच्या पतीचे नाव विक्रांत रामदास असून तो लेखक व दिग्दर्शक आहे. ‘इंदिरा’ या लघुपटाचे दिग्दर्शन त्याने केले आहे. लग्नसोहळ्यात स्वानंदीने हिरव्या रंगाची नववारी साडी परिधान केली होती. पारंपरिक नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर आणि गळ्यातील दागिन्यांमुळे तिच्या रूपात विशेष खुलून आले होते. तर विक्रांत रामदास याने पांढऱ्या रंगाचे धोतर, सदरा आणि शेला असा पारंपरिक वेश परिधान केला होता. दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कोकणातील निसर्ग आणि साध्या जीवनशैलीशी घट्ट नातं जपणारी स्वानंदी तिच्या वेगळ्या शैलीमुळे ओळखली जाते. तिच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावरून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘ऐका ना…’ म्हणणारी स्वानंदी सरदेसाई लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साध्या पद्धतीने विवाह Read More »

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण; आरोपी आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला

राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला न्यायालयाने मोठा दणका देत वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेला चार महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्याला पोलीस देखरेखीखाली आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी कशेळी येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांना थार गाडीखाली चिरडून ठार मारल्याचा आरोप आंबेरकरवर आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल असून आंबेरकर सध्या कारागृहात आहे. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून आंबेरकरला सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपल्यानंतर त्याने पुन्हा चार महिन्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले की, आंबेरकरला उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी स्टोन आणि पित्ताशयात खडे असल्याचे आजार आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जाण्याची परवानगी व स्वखर्चाने उपचार करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाने या अर्जाला जोरदार विरोध करत आंबेरकरवर गंभीर गुन्हा दाखल असून त्याचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा फरार होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. आवश्यक उपचार पोलीस बंदोबस्तातही देता येऊ शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय अहवालानुसार आरोपीला तातडीने जामिनावर सोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. आवश्यक असल्यास पोलीस देखरेखीखाली खासगी रुग्णालयात उपचार करता येतील, असे नमूद करत न्यायालयाने आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला Read More »

चिपळूण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही – मंत्री नितेश राणे

चिपळूण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही; भुयारी गटार योजनेला लवकर मंजुरी – मंत्री नितेश राणे

चिपळूण : मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी चिपळूण शहरातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, तसेच आवश्यक तेवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीदरम्यान चिपळूण शहरातील बहुचर्चित भुयारी गटार योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देत, या योजनेला तातडीने मंजुरी मिळवून दिली जाईल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले. या प्रसंगी चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, माजी नगरसेवक विजय चितळे, अर्बन बँक संचालक दिपाशेठ देवकर आणि अमोल तटकरे उपस्थित होते.

चिपळूण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही; भुयारी गटार योजनेला लवकर मंजुरी – मंत्री नितेश राणे Read More »