चिपळूण : मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी चिपळूण शहरातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, तसेच आवश्यक तेवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान चिपळूण शहरातील बहुचर्चित भुयारी गटार योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देत, या योजनेला तातडीने मंजुरी मिळवून दिली जाईल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.
या प्रसंगी चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, माजी नगरसेवक विजय चितळे, अर्बन बँक संचालक दिपाशेठ देवकर आणि अमोल तटकरे उपस्थित होते.















