चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत शहरातील अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
माजी सभापती पूजा निकम यांनी नवप्रवेशित महिलांचे संपर्क कार्यालयात स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. रहिमत जबले यांच्या पुढाकारातून हा प्रवेश पार पडला. शहर महिला अध्यक्ष आदिती देशपांडे यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करून पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनीषा जोगले, नेत्रा जोगले, दीप्ती भुवड, सेजल जोगले, ममता शेडगे, अनिता गुढेकर, शुभांगी घाडगे, सुहासिनी शेडगे, अकीला शहा, फरहाना शेख, रईसा कास्कर, रिजवाना सय्यद, फातिमा झारे, रुबिना कास्कर, चंद्रभागा घडशी, प्रांजली शीतप आणि नम्रता भुवड यांनी पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पूजताई निकम, नगरसेविका शहनाज वांगडे, महिला प्रदेश प्रतिनिधी दिशा दाभोळकर, महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, शहराध्यक्ष आदिती देशपांडे तसेच रवीना गुजर, मनाली जाधव, पुनम भोजने, रहेमत जबले, मीरा नारकर, निहालिका तांबडे आदी उपस्थित होते.
नवप्रवेशित महिलांनी हा निर्णय केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे सांगितले. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.















