konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • लहान वयात मोठी भरारी – रिया ठसाळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे झेपावली
१३ वर्षीय रिया ठसाळेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिनमध्ये यश

लहान वयात मोठी भरारी – रिया ठसाळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे झेपावली

चिपळूण : कोकणच्या मातीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान खेळाडू रिया स्नेहा सचिन ठसाळे हिने जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन या खेळात आपली चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. केवळ १३ वर्षे वय असलेल्या रियाने आपल्या मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत आता भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.

दि. १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी चेन्नई (तमिळनाडू) येथील हॉल ऑफ जिमनॅस्टिक येथे ७वी ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप तसेच २री आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातून अनेक गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत रियाने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत तिसरे स्थान पटकावले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

या यशामुळे रिया आता चीनमधील हॉंगकॉंग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या क्रीडा कारकिर्दीतील हे अत्यंत महत्त्वाचे आणि अभिमानास्पद पाऊल मानले जात आहे.

रिया ही चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावची असून सध्या मुंबईतील नायगाव-दादर (पूर्व) येथे वास्तव्यास आहे. ती IES V. N. Sule Guruji English Medium Secondary School, दादर हिंदू कॉलनी येथे शिक्षण घेत आहे. लहान वयातच खेळाबद्दल निर्माण झालेली आवड, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे तिने हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशामागे तिचे आई-वडील स्नेहा ठसाळे आणि सचिन ठसाळे यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच पॉवर जम्प स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षिका शिवानी दौड मॅडम आणि शेफाली मॅडम यांचे मार्गदर्शनही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. योग्य प्रशिक्षण, कुटुंबाचा पाठिंबा आणि तिची जिद्द यामुळे रियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा मार्ग खुला केला आहे.

रिया ठसाळेच्या या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार, कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांकडून तिचे मनापासून कौतुक करण्यात येत आहे. भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा ठाम विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे