konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • “तापमान मोजायला यंत्रच नाही ; शेतकऱ्यांचा जीव कसा वाचवणार ?” — जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
Image

“तापमान मोजायला यंत्रच नाही ; शेतकऱ्यांचा जीव कसा वाचवणार ?” — जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा उष्णतेचा मोठा फटका बसत असताना, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. मार्च महिन्यात तापमानाने ३७ अंशांचा टप्पा ओलांडला, मात्र जिल्ह्यातील अनेक भागांत तापमान नोंदविण्यासाठी आवश्यक यंत्रणाच नसल्याने प्रत्यक्ष परिस्थितीची नोंदच होत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना होणारे नुकसान शासनापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, नुकसानभरपाईपासूनही शेतकरी वंचित राहत आहेत. “तक्रारी करूनही प्रशासन झोपेतच आहे का ?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असताना, फळपिकांवर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. आंबा व काजू पिकांची मोठ्या प्रमाणावर गळती होत असून, अनेक ठिकाणी फळधारणा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही अधिकृत तापमान नोंदीअभावी या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे.

शासनाने फळपिक विमा योजना लागू केली असली तरी, त्यातील तांत्रिक अडचणी व निकषांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही. विमा कंपन्या व शासन यांच्यातील विसंगतीमुळे नुकसानभरपाई वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

“तापमान नोंदविण्याची यंत्रणा तात्काळ बसवावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी आणि विमा योजनेतील त्रुटी दूर कराव्यात,” अशी ठाम मागणी वेंगुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष व शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

👉 निष्क्रिय प्रशासनामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतलेली परिस्थिती आता किती दिवस सहन करायची ?

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान