konkandhara.com

कोकणची बातमी

konkandhara 2026 05 01T223344.745

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 चा समारोपजन चळवळ म्हणून 365 दिवस राबवा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन हे केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून 365 दिवस राबवा. यातून पाणी टंचाईवर विचार करुन योग्य नियोजन व्हायला हवे, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.कोकण पाटबंधारे विकास महामंडळ रत्नागिरी पाटबंधारे मंडळ यांच्यामार्फत जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा समारोप पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या उपस्थित आज झाला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार बोरकर, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन महाडिक, शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अतिशय प्रामाणिकपणे जिल्ह्यामध्ये हा पंधरवडा राबवला आहे. त्याबद्दल मनापासून कौतुक करतो. राज्यामध्ये तीनशे कोटी झाडं लावायची आहेत. जलसंपदा विभागाने यामध्ये वनविभागाबरोबर पुढाकार घ्यावा. ती जगली पाहिजेत. त्याच्यासाठी उपाय योजना देखील आपण सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे. जल व्यवस्थापनाची जन चळवळ सुरू करावी. सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ साफ करण्याचा निर्णय डीपीसीमधून घेतला. नाम फाउंडेशनमार्फत दहा ते पंधरा काम सुरू आहेत. त्यामुळे चिपळूण सारख्या शहरात गेल्या दोन तीन वर्षात पाणी आलेले नाही. गावांची पाण्याची पातळी वाढण्यासही मदत झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना राज्यात आणली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या अनेक गावांची पाण्याची पातळी वाढली. सध्याच्या तापमानाचा आकडा बघितला, जलसाठ्यांचे बाष्पीभवन टाळायचं असेल तर फ्लोटींग सौर प्रकल्प बसविण्याबाबत विचार करायला हवा. असा प्रयोग शीळ धरणावर पथदर्शी प्रकल्प म्हणून करु. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र पावन झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालाय. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र ! छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरीचे धरण बांधून जलसंपदा विभागाला प्रेरणा दिली आहे. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसताना, छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने आणि संकल्पनेने या धरणाची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, देशपातळवरील राजे होते. ज्यावेळी मी तंजावरला गेलो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय आणि कशा पद्धतीने केले, याची जाणीव मला झाली. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून एक प्रकारे मंत्रालयाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 व्या शतकामध्ये केली होती. समुद्रामध्ये किल्ला बांधून त्यावर गोड्या पाण्याचा तलाव असावा, ही संकल्पना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. खऱ्या अर्थाने जलसंपदा विभाग 16 व्या शतकात उदयाला आणला. याचा अभ्यास आपण करायला हवा. पिण्याच्या पाण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पाणी टंचाईवर विचार केला पाहिजे. पाणी टंचाईवर या जिल्ह्याला मात करावीच लागेल. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पंधरवड्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर विभागाच्या अधिकाऱ्यांना टॅब आणि आधारकेंद्र चालकांना आधार संचाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सर विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन दीपप्रज्ज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुर्वे यांनी केले. तर कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी पंधरवड्यातील उपक्रमांची माहिती दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 चा समारोपजन चळवळ म्हणून 365 दिवस राबवा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत Read More »

konkandhara 2026 05 01T222655.929

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदनामहाराष्ट्र राज्याला, राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये-पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : विमानतळ उड्डाणासाठी तयार आहे. रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पुर्णत्वास येत आहे. नगरपालिकेचे इमारत देखील पूर्ण झालेली आहे. जिल्हा परिषदेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे. 169 कोटी रुपयांमधून पोलीस इमारतीचे बांधकाम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र देखील येत्या 2 ते 3 महिन्यात लोकार्पण करणार आहोत. आरेवारे किनाऱ्याजवळील वन खात्याच्या जमिनीवर 5 कोटी रुपयांचे इको ट्युरिझम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल. महाराष्ट्र राज्याला, महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये करतोय. या विकासाला जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंतयांनी आज व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकावून त्याला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी, इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. तसेच परेड संचालनाकडून मानवंदना स्वीकारली.शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिक बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्यादेखील मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी 1960 सालामध्ये मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अनेक स्वातंत्र्य सेनानी असतील, समाजसेवक असतील त्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र निर्माण झाला आहे. ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे. ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांची आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. म्हणूनच अभिमानाने जय महाराष्ट्र कायमस्वरुपी संबोधत असतो. त्याच महाराष्ट्राला वंदन करण्याचा आज दिवस आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबत नाविन्यपूर्ण उपक्रम सांगायचे झाले तर आपल्या उपक्रमांची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्त्रो येथील अभ्यास दौरा ही योजना आपण 4 वर्षापासून रत्नागिरीत सुरु केली. आज ती योजना अख्या महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याचा अर्थ रत्नागिरीचे जिल्हा प्रशासन नाविन्यपूर्ण योजना राबवितो. हे महाराष्ट्राच्या पातळीवर सिध्द झाले आहे. रत्नागिरीचे पोलीस दल हे सक्षम असावे, यासाठी नियोजन मंडळातून मागच्याच 15 दिवसांपूर्वी नवीन 25 गाड्यांचा लोकार्पण सोहळा झाला आहे. आज देखील काही नवीन गाड्यांचा लोकार्पण होत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस दल हे सक्षम असावं, हा त्यामागचा भाव आणि त्यामागची भावना आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आराखडा 29 कोटींनी वाढवून दिला आहे. यामधून कृषी, मत्स्य, शिक्षण, पर्यटन अशा सगळ्याच बाबींवर आपण खर्च करत आहोत. गेल्या अर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून 406 कोटींचा निधी खर्च झाला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी केंद्रीय विद्यालय मंजूर झाले आहे. त्याला 1 रुपये नाममात्र दराने नाचणे मधील अडीच हेक्टर जागा देण्याचा निर्णय कालच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक वैभवामध्ये फार मोठी भर पडणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 100 टक्के पूर्ण केली. पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्यांचे वितरण झाले आहे. नमो किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 589 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. फळपीक विम्यामधून देखील 107 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, मंडणगड, रत्नागिरी, राजापूर या पाच मतदार संघामध्ये प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे संविधान भवन उभारण्यात येत आहेत. हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे. या संविधान भवनमध्ये युपीएससी, एमपीएससी याचे प्रशिक्षण आपण सुरु करणार आहोत. बार्टीचे कार्यालय तालुका ठिकाणी असावे, हा प्रयत्न देखील संविधान भवनच्या माध्यमातून करणार आहोत. रत्नागिरी जिल्हा आणि जिल्ह्याचे प्रशासन महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे पहिले प्रशासन आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून 31 रुग्णांलयाची नोंद झाली आहे. यामधून शेकडो रुग्णांना फायदा दिलेला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून देखील 4 कोटी 78 रुपयांचे अनुदाने लाभार्थ्यांना दिले आहे. आरेवारे किनारा येथील वन खात्याच्या जमिनीवर 5 कोटी रुपये खर्च करुन इको ट्युरिझम उभारण्याचा निर्णय जिल्हा नियोजन मंडळाने घेतला आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल. रत्नागिरी विमानतळ देखील उड्डाणासाठी तयार झालेले आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. रत्नागिरी प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पूर्णत्वास येत आहे. नगरपालिकेचे इमारत देखील पूर्ण झालेली आहे. जिल्हा परिषदेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे. पोलीसांसाठी दिलेल्या 169 कोटी रुपयांमधून इमारतीचे बांधकाम सुरु आहे. महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा प्रशासकीय इमारती परिपूर्ण असलेला आणि नवा असलेला हा पहिला जिल्हा आहे, याचा मला अभिमान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. रत्नागिरीमध्ये उभारलेल्या शिवसृष्टीला लाखो पर्यटकांनी आजपर्यंत भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र देखील येत्या 2 ते 3 महिन्यात लोकार्पण करणार आहोत. महाराष्ट्र राज्याला, महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये करतोय आणि या विकासाला रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध सन्मानसागर कवच अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विवेक पाटील, अंमलदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दिपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गव्हाणे, शीतल पिंजरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्ररशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय राजापूर यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापक एस.बसवराज, वैष्णवी पाटोळे, देवयानी महात्मे, प्रशब्ध कांबळे, दुर्वा शिंदे, दिपाल भंडारी, मंजिरी तांबे, गंधार संसारे, सार्थक दुर्गावळे, आर्यन मेन, कार्तिक हदमबर यांचा सन्मान करण्यात आला.पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते अश्विनी मोरे, निकिता जाधव, साक्षी गावणांग, धनश्री मोरे यांना वितरीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलास देण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदनामहाराष्ट्र राज्याला, राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये-पालकमंत्री डॉ. उदय सामंत Read More »

konkandhara 2026 05 01T221701.607

कोलाडात मुंबई गोवा महामार्ग ट्रॅफिक जाम .

शाळेला सुट्या, गावाकडची ओढ ,चाकरमानी कोकणात. सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने टीम कडून वाहतूक सुरलित कोलाड १ एप्रिल (शरद जाधव) कोकण म्हटलं की निसर्ग याची भुरळ सर्वांनाच असते. कोकणात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र वाढत आहे. बहुतांशी कोकणातले चाकरमानी मुंबई कामाला असतात. मुलांना शालेय सुट्टया पडल्याने गावाकडची ओढ त्यामुळे संपूर्ण चाकरमाने कोकणात दाखल झाला. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड ते खांब दरम्यान अचानक वाहतूक ट्राफिक वाढली. लांबच्या लांब वाहनांच्या रांगा रस्त्यावर दिसू लागल्या हे दृश्य पाहून पोलीसही काही वेळ गडबडले अचानक एवढी वाहतूक कशी वाढली. तातडीने पोलीस तैनात करून वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. मुंबई गोवा महामार्गावर खांब ते पुढे वरसगाव पर्यंत आजही रस्त्याचे काम रखडले आहे.पुलाचे काम बाकी आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी या परिसरात ट्रॅफिक जाम होते. मुलांना सुट्टी पडल्याने कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप वाढली आहे. आज १ मे रोजी कोलाड येथे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली. थोड्या वेळा करता पोलिसांना सुद्धा सुचेनासे झाले एवढी मोठी वाहनांची गर्दी कशी काय. परिसरातील नागरिकांना वाटले की एखादा अपघात झाला असेल म्हणून इतर रस्त्याला गाड्या फिरवले असतील. परंतु पोलिसांशी संपर्क साधला असता मे महिन्याचा मुलांना सुट्टी पडल्या आहेत व एक मे महाराष्ट्र दिन सुट्टीचा दिवस आहे पुढे शनिवार रविवार सुट्ट्या पडल्याने चाकरमान्यांबरोबर पर्यटक सुद्धा कोकणात आले आहेत. त्यामुळे केवल कोलाड येथेच नव्हे तर कोकणातील पूर्ण महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक दिसत आहे. कोलाड पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवण्यात दम छाक झाली. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून . वाहतूक कोंडी सुरळीत केली. पोलीस आपले काम प्रामाणिक करीत असतात. परंतु वाहन चालक हे शिस्तीचे पालन करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते .अशी माहिती कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने यांनी दिली

कोलाडात मुंबई गोवा महामार्ग ट्रॅफिक जाम . Read More »

konkandhara 2026 04 30T161216.368

चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव

चिपळूण : जिल्हा हिवताप कार्यालय, चिपळूण अंतर्गत कार्यरत असलेले चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथील श्री. अभिजित कमलाकर यादव यांची रत्नागिरी जिल्ह्यातून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी रत्नागिरी येथील मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर विष्णू जगताप यांच्या हस्ते श्री. यादव यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कार्य करत राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, चिपळूण तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री. सुनील जानवलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. श्री. अभिजित यादव हे सामाजिक, आरोग्य व सहकार क्षेत्रातही सक्रिय असून महाराष्ट्र राज्य जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना शाखा रत्नागिरी उपाध्यक्ष, जिल्हा हिवताप कर्मचारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी व्हाईस चेअरमन, तालुका आरोग्य समन्वय समिती चिपळूण उपाध्यक्ष, निरंतर वैद्यकीय सेवा संस्था मर्यादित रत्नागिरी (सहकार मेडिकल) उपाध्यक्ष तसेच सूर्यमुखी मारुती मंदिर एमआयडीसी खेर्डी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव Read More »

konkandhara 2026 04 28T010116.378

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत ध्वजवंदन; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रमुख सोहळा

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : महाराष्ट्र दिन निमित्त शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. नगरपालिकेकडून पाण्याची व्यवस्था, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून रुग्णवाहिका, क्रीडा विभागाकडून साऊंड सिस्टीम तसेच महावितरण (MSEB) कडून अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सांगितले की, मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 8 वाजता असल्याने इतर कोणत्याही शासकीय किंवा अर्धशासकीय संस्थांनी सकाळी 7.15 ते 9 या वेळेत ध्वजवंदन अथवा कार्यक्रम आयोजित करू नयेत. जर स्वतंत्र कार्यक्रम घ्यायचा असेल, तर तो सकाळी 7.15 पूर्वी किंवा 9 नंतरच आयोजित करावा. कार्यक्रमादरम्यान सावधान स्थितीत ‘वंदे मातरम्’ गीत सादर करणे, त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणणे आणि लगेच राज्यगीत सादर करणे आवश्यक असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या सर्व सूचनांची माहिती ग्रामीण स्तरावरील संस्था, शाळा व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी व त्यांचे काटेकोर पालन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत ध्वजवंदन; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रमुख सोहळा Read More »

konkandhara 2026 04 28T005434.964

रत्नागिरी जिल्ह्यात 13 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान; संबंधित गावांमध्ये सुट्टी जाहीर

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी निश्चित करण्यात आली आहे. मतदानाचा दिवस कामाचा असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून त्या-त्या गावांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्य निवडणूक आयोग यांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार फक्त निवडणूक लागू असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रापुरतीच लागू राहणार आहे. या पोटनिवडणुका गुहागर तालुक्यातील खोडदे, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, कोंडगाव, तुरळ, राजिवली आणि ओझरखोल, लांजा तालुक्यातील भडे तसेच राजापूर तालुक्यातील केळवली माडबन, भालावली, कळसावली, कोंड्ये तर्फे सौंदळ आणि धाऊलवल्ली या गावांमध्ये होणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 13 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान; संबंधित गावांमध्ये सुट्टी जाहीर Read More »

konkandhara 2026 04 28T004045.107

देवस्थान जमिनींचा प्रश्न सुटणार; साडेचार लाख हेक्टर जमिनींवर शेतकऱ्यांना मालकी हक्क

मुंबई, दि. २७ एप्रिल २०२६ : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा मोठा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. पिढ्यानपिढ्या देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या वहिवाटदार शेतकऱ्यांना आता त्या जमिनींचे मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर जमिनीवरील हस्तांतरण आणि विकासाचे निर्बंध हटणार असून, लवकरच यासंदर्भातील नवीन धोरण जाहीर होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात राजे-महाराजांच्या काळात मंदिर, मठ आणि देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी इनाम म्हणून देण्यात आल्या होत्या. या जमिनींवर अनेक वर्षांपासून कुळ किंवा शेतकरी शेती करत असले तरी कागदोपत्री मालकी हक्क नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. जमिनींचे कायदेशीर हस्तांतरण होत नसल्याने शेतकरी वर्ग अनिश्चिततेत होता; मात्र आता ही कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. सरकारच्या प्रस्तावानुसार, या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करताना ठराविक अधिमूल्य आकारले जाणार आहे. हे अधिमूल्य संबंधित देवस्थानांना देण्यात येईल, ज्यामुळे मंदिरांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होईल. तसेच ज्या ठिकाणी जमिनी पुजाऱ्यांच्या ताब्यात असून त्या प्रत्यक्षात वहिवाटदार कसत आहेत, त्या प्रकरणांतही ठराविक अधिमूल्य भरून शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्क देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. या जमिनींच्या हस्तांतरणावरील निर्बंध हटवल्यामुळे शेती, बांधकाम व इतर विकासकामांना गती मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक चक्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवस्थान, कुळ आणि वहिवाटदार यांच्यातील हक्क स्पष्ट करण्यासाठी सरकार सर्वसमावेशक कायदा तयार करत आहे. या कायद्याचा मसुदा लवकरच जाहीर करून त्यावर जनतेच्या हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यानंतर जुलै महिन्यात होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

देवस्थान जमिनींचा प्रश्न सुटणार; साडेचार लाख हेक्टर जमिनींवर शेतकऱ्यांना मालकी हक्क Read More »

konkandhara 2026 04 28T003457.250

चिपळूणमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक

चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने बालकांसाठी विशेष बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांमधील अभिनय, संवादकौशल्य, रंगमंचावरील आत्मविश्वास, शारीरिक अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे. हे शिबिर दि. १ ते १० मे २०२६ या कालावधीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार असून ७ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना यात सहभागी होता येणार आहे. शिबिरात प्रा. रश्मी नंदकुमार देव (पुणे) या नाट्य प्रशिक्षक, अभिनेत्री, दिग्दर्शिका व माहितीपट निर्माती मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरादरम्यान अभिनय, संवादफेक, शरीरभाषा, रंगमंचावरील हालचाली, टीमवर्क आणि बालनाट्य सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, शिबिराच्या अखेरीस बालनाट्य सादरीकरणही होणार आहे. नोंदणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून मोजक्या जागा उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ॲड. विभावरी रजपूत (७७९६७२९५८७) आणि दिलीप आंब्रे (८२९१०८९३०२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीची ओळख करून देणारा आणि मुलांमध्ये कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम लवकरच रंगणार असून, पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

चिपळूणमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक Read More »

konkandhara 2026 04 28T002947.356

देवरुखमध्ये पार्किंगमधून कार चोरी; काही तासांत लोवले येथे बेवारस अवस्थेत सापडली

संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख येथील कृष्णा रेसिडन्सीच्या पार्किंगमधून मारुती झेन कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. मात्र, हीच गाडी काही तासांत संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गावरील लोवले येथे बेवारस स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अमित वासुदेव साने (वय ५२, रा. कृष्णा रेसिडन्सी, देवरुख) यांनी आपली सिल्व्हर रंगाची मारुती झेन (एमएच १२ सी के ०४८३) नेहमीप्रमाणे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. २६ एप्रिल रोजी रात्री १०:३० ते २७ एप्रिल रोजी सकाळी ७:३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली. सकाळी गाडी जागेवर नसल्याचे लक्षात येताच साने यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. देवरुख पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, संगमेश्वर-देवरुख मार्गावरील लोवले येथे शिव शंभो वडापाव दुकानासमोर एक सिल्व्हर रंगाची झेन गाडी बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचून खात्री केली असता, हीच चोरीला गेलेली गाडी असल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने गाडी तिथेच सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरेश कदम आणि नामदेव जाधव यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एन. एन. कामेरकर करत आहेत. भरवस्तीतील इमारतीच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण होते. मात्र गाडी तातडीने मिळून आल्याने नागरिकांसह पोलिसांनीही दिलासा व्यक्त केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध

देवरुखमध्ये पार्किंगमधून कार चोरी; काही तासांत लोवले येथे बेवारस अवस्थेत सापडली Read More »

konkandhara 100

संगमेश्वरला ५ गाड्यांच्या थांब्याची शक्यता; कोकण रेल्वे बैठकीत सकारात्मक आश्वासन

संगमेश्वर (प्रतिनिधी): कोकण रेल्वे संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी समोर आल्या आहेत. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.ही बैठक पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ या फेसबुक समूहाचे प्रमुख संदेश जिमन यांनी यावेळी CMD यांचे आभार मानले.बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकावर एकूण ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार असून, त्यावर अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.तसेच मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम स्पेशल या विशेष गाडीला संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनावरही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांतील डब्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे. याशिवाय, स्थानकावर तिकीट तपासनीस (TC) यांची दररोज तपासणी सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होणार आहे.या बैठकीस गंगाराम टोपरे, मुकुंद सनगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, या बैठकीत पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन संतोष झा यांच्याकडे दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याची मागणी करण्यात आली, तर मांडवी एक्सप्रेस या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्याची मागणीही करण्यात आली. यापैकी शिल्पकारांच्या नावाचा फलक लावण्यास तात्काळ मान्यता देण्यात आली आहे.या निर्णयांमुळे संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संगमेश्वरला ५ गाड्यांच्या थांब्याची शक्यता; कोकण रेल्वे बैठकीत सकारात्मक आश्वासन Read More »