konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक
Image

चिपळूणमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक

चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने बालकांसाठी विशेष बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांमधील अभिनय, संवादकौशल्य, रंगमंचावरील आत्मविश्वास, शारीरिक अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.

हे शिबिर दि. १ ते १० मे २०२६ या कालावधीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार असून ७ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना यात सहभागी होता येणार आहे. शिबिरात प्रा. रश्मी नंदकुमार देव (पुणे) या नाट्य प्रशिक्षक, अभिनेत्री, दिग्दर्शिका व माहितीपट निर्माती मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरादरम्यान अभिनय, संवादफेक, शरीरभाषा, रंगमंचावरील हालचाली, टीमवर्क आणि बालनाट्य सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, शिबिराच्या अखेरीस बालनाट्य सादरीकरणही होणार आहे.

नोंदणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून मोजक्या जागा उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ॲड. विभावरी रजपूत (७७९६७२९५८७) आणि दिलीप आंब्रे (८२९१०८९३०२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी रंगभूमीची ओळख करून देणारा आणि मुलांमध्ये कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम लवकरच रंगणार असून, पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान