शाळेला सुट्या, गावाकडची ओढ ,चाकरमानी कोकणात.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने टीम कडून वाहतूक सुरलित
कोलाड १ एप्रिल (शरद जाधव)
कोकण म्हटलं की निसर्ग याची भुरळ सर्वांनाच असते. कोकणात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र वाढत आहे. बहुतांशी कोकणातले चाकरमानी मुंबई कामाला असतात. मुलांना शालेय सुट्टया पडल्याने गावाकडची ओढ त्यामुळे संपूर्ण चाकरमाने कोकणात दाखल झाला. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड ते खांब दरम्यान अचानक वाहतूक ट्राफिक वाढली. लांबच्या लांब वाहनांच्या रांगा रस्त्यावर दिसू लागल्या हे दृश्य पाहून पोलीसही काही वेळ गडबडले अचानक एवढी वाहतूक कशी वाढली. तातडीने पोलीस तैनात करून वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.
मुंबई गोवा महामार्गावर खांब ते पुढे वरसगाव पर्यंत आजही रस्त्याचे काम रखडले आहे.पुलाचे काम बाकी आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी या परिसरात ट्रॅफिक जाम होते. मुलांना सुट्टी पडल्याने कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप वाढली आहे. आज १ मे रोजी कोलाड येथे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली. थोड्या वेळा करता पोलिसांना सुद्धा सुचेनासे झाले एवढी मोठी वाहनांची गर्दी कशी काय. परिसरातील नागरिकांना वाटले की एखादा अपघात झाला असेल म्हणून इतर रस्त्याला गाड्या फिरवले असतील.
परंतु पोलिसांशी संपर्क साधला असता मे महिन्याचा मुलांना सुट्टी पडल्या आहेत व एक मे महाराष्ट्र दिन सुट्टीचा दिवस आहे पुढे शनिवार रविवार सुट्ट्या पडल्याने चाकरमान्यांबरोबर पर्यटक सुद्धा कोकणात आले आहेत. त्यामुळे केवल कोलाड येथेच नव्हे तर कोकणातील पूर्ण महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक दिसत आहे. कोलाड पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवण्यात दम छाक झाली. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून . वाहतूक कोंडी सुरळीत केली.
पोलीस आपले काम प्रामाणिक करीत असतात. परंतु वाहन चालक हे शिस्तीचे पालन करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते .अशी माहिती कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने यांनी दिली















