konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • देवरुखमध्ये पार्किंगमधून कार चोरी; काही तासांत लोवले येथे बेवारस अवस्थेत सापडली
Image

देवरुखमध्ये पार्किंगमधून कार चोरी; काही तासांत लोवले येथे बेवारस अवस्थेत सापडली

संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख येथील कृष्णा रेसिडन्सीच्या पार्किंगमधून मारुती झेन कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. मात्र, हीच गाडी काही तासांत संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गावरील लोवले येथे बेवारस स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

अमित वासुदेव साने (वय ५२, रा. कृष्णा रेसिडन्सी, देवरुख) यांनी आपली सिल्व्हर रंगाची मारुती झेन (एमएच १२ सी के ०४८३) नेहमीप्रमाणे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. २६ एप्रिल रोजी रात्री १०:३० ते २७ एप्रिल रोजी सकाळी ७:३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली. सकाळी गाडी जागेवर नसल्याचे लक्षात येताच साने यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

देवरुख पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, संगमेश्वर-देवरुख मार्गावरील लोवले येथे शिव शंभो वडापाव दुकानासमोर एक सिल्व्हर रंगाची झेन गाडी बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचून खात्री केली असता, हीच चोरीला गेलेली गाडी असल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने गाडी तिथेच सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच सुरेश कदम आणि नामदेव जाधव यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एन. एन. कामेरकर करत आहेत.

भरवस्तीतील इमारतीच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण होते. मात्र गाडी तातडीने मिळून आल्याने नागरिकांसह पोलिसांनीही दिलासा व्यक्त केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान