konkandhara.com

कोकणची बातमी

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ Read More »

रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रत्नागिरी विभागाला तब्बल १०० बसेस मिळणार आहेत. या बसेस टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील ९ आगारांमध्ये दाखल होणार आहेत. मुंबई येथे नुकतेच या नव्या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल होणार आहेत. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ३ बाय २ आसन क्षमता यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवा सुरू करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या माध्यमातून एसटी सेवेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवास करताना अनेक प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन ३ बाय २ आसन क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या बसेसमुळे अधिक प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेची सुरुवात नागपूर येथून होणार असून प्रारंभी तेथे ५० बसेस दाखल होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांना बसेस देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या बसेस लवकरच दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी” Read More »

मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली ही सेवा, त्याच दिवशी बंद पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.इतक्या चर्चेत असलेला हा प्रकल्प एवढ्या लवकर का बंद पडला?यामागची कारणं आता समोर येऊ लागली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,ही सेवा कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार होती.मात्र, तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकांनी या सेवेकडे पाठ फिरवली.फक्त प्रवासच नाही,तर बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही अत्यंत महाग असल्याच्या तक्रारी समोर आल्या.त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत होता.याशिवाय,या बोटीत मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे समोर आले आहे.शौचालय, बसण्याची सोय, विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा या बाबतीतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.एकीकडे मोठा गाजावाजा…आणि दुसरीकडे अपुरी सेवा…यामुळे प्रवाशांचा अनुभव समाधानकारक ठरला नाही.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,या सेवेला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही.दररोज ५० पेक्षाही कमी प्रवासी या सेवेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच,प्रवाशांचा कमी प्रतिसाद,महागडे तिकीट दर,अपुर्‍या सुविधाआणि वाढती नाराजी…या सगळ्यांचा परिणाम म्हणूनमुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा अखेर बंद पडल्याचं चित्र दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की,कोकणासाठी महत्त्वाकांक्षी मानला गेलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार का?की ही सेवा फक्त घोषणांपुरतीच मर्यादित राहणार?याकडे आता कोकणवासियांचे लक्ष लागले आहे.

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद Read More »

sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत

संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे संबंधित संशयित हा संगमेश्वर पंचायत समितीत लिपिक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरूख येथील संगणक वर्ग आटोपून बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांचा पाठलाग सुरू केला. मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ संशयिताने दुचाकी थांबवून विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन त्याने अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेनंतर पालकांनी विद्यार्थिनींना धीर देत २ एप्रिल रोजी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करत आहेत.

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत Read More »

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे संभाव्य मोठे संकट टळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक श्री. प्रमोद बुरटे यांनी तत्काळ पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांना कळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. कोवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता यंत्रणा घटनास्थळी धाडली आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले. मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू असतानाच, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा अक्षरशः धावली. सुपरवायझर घडशी, ज्येष्ठ कर्मचारी खांबे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सलग १२ तास जीवाचे रान करत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. विशेष म्हणजे, संध्याकाळच्या नियोजित वेळेपूर्वीच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा त्रास टळला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या संपूर्ण कारवाईत पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांचे नेतृत्व ठळकपणे पुढे आले. तातडीचे निर्णय, प्रभावी समन्वय आणि कामावरील पकड यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित झाली. त्यांच्या तत्परतेमुळे एक मोठे संकट अवघ्या काही तासांत नियंत्रणात आणले गेले. घटनेनंतर शहरभरातून श्री. कोवळे आणि त्यांच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत असून, “अशाच तत्पर आणि जबाबदार कामाची अपेक्षा आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात Read More »

nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास घडली.सुधीर मुन्नालाल केवट (मुळ रा.अमिलीया सोनवर्षा ता.नयगडी मध्यप्रदेश सध्या रा.कळंबोली,नवी मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रमोद गणपत यमगर (29,रा.चितली खटाव जि.सातारा) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी संशयित चालक सुधीर केवट हा आपल्या ताब्यातील 18 चाकी गाडी (एमएच-46-सीएल-5981) घेउन निवळी ते जयगड असा जात असताना रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता गाडी चालवल्याने अपघात झाला. या अपघातात गाडीचे आणि गाडीत असलेल्या फोर्थलिफ्ट (एमएच-43-बीवाय-5755) चेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल Read More »

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या मनगटावर कोयती मारुन दुखापत केली. ही घटना शुक्रवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा.सुमारास वेरवली-डाफळेवाडी लांजा येथे घडली.स्वाती भिकाजी पवार (रा.वेरवली डाफळेवाडी,लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सूनेचे नाव आहे. तिच्या विरोधात सासू सत्यवती सखाराम पवार (75,रा.वेरवली डाफळेवाडी,लांजा) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार, या दोघ्ाी एकाच घरात विभक्त राहतात. शुक्रवारी सायंकाळी सत्यवती पवार यांची संशयित सून स्वाती आणि मुलगा यांच्यात मोठ-मोठ्याने भांडण सूरु होते. म्हणून त्यांना समजावण्यासाठी सत्यवती पवार आणि साक्षिदार बाळकृष्ण पवार हे दोघे गेले असता संशयित सुनेने त्यांनाच शिवीगाळ व दमदाटी करुन सासूला कोयतीने मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल Read More »

WhatsApp Image 2026 04 04 at 8.30.54 PM

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. प्रतीक संजय भंडारी (रा. नाशिक) हा आपल्या मित्रांसह XUV300 (MH 15 JH 0516) या कारने गणपतीपुळे येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. अपघातात कृष्णा आव्हाड, संदीप डेरिंगे व चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूणचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मदतकार्य केले.

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी Read More »

लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पाठिंबा मिळाला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या समस्या आणि आंदोलनामागील जनहिताचा उद्देश जाणून घेत त्यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनक जन आक्रोश समिती यांच्या प्रतिनिधींनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लक्ष्मी ऑरगॅनिककडून ‘पी-फास’सारख्या घातक रसायनांची निर्मिती होत असून, त्यामुळे कोकणातील पर्यावरण आणि मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, हा लढा कोणत्याही वैयक्तिक किंवा राजकीय हेतूने नसून कोकणचा निसर्ग, शेती, पाणी आणि स्थानिकांचे जीवन वाचवण्यासाठी उभारलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेने या जनआंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी या लढ्याला मनसेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. “जिथे जिथे गरज लागेल, तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत ठामपणे उभी राहील,” असे त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही, “या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे,” असे स्पष्ट करत संघर्षाला राजकीय व नैतिक बळ दिले. या भेटीवेळी मनसेचे दक्षिण मुंबई संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, तसेच लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, कोकण नागरी संघर्ष समिती, जनआक्रोश समितीचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ Read More »

RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या RAIDS App च्या मदतीने नागपूर जिल्हा पोलीसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. संबंधित व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असताना नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी समन्वय साधला. यानंतर RAIDS App च्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेच्या मदतीने अवघ्या २ तासांत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सदर मृत व्यक्ती ही दौलामेटी, आठवा मैल, नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे उत्कृष्ट उदाहरण ठरली असून, गुन्हे तपास प्रक्रियेला गती देणारी आणि पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेची साक्ष देणारी असल्याचे मानले जात आहे.

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख Read More »