konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत

संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे संबंधित संशयित हा संगमेश्वर पंचायत समितीत लिपिक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरूख येथील संगणक वर्ग आटोपून बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांचा पाठलाग सुरू केला.

मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ संशयिताने दुचाकी थांबवून विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन त्याने अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता.

घटनेनंतर पालकांनी विद्यार्थिनींना धीर देत २ एप्रिल रोजी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करत आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे