konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे संभाव्य मोठे संकट टळले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक श्री. प्रमोद बुरटे यांनी तत्काळ पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांना कळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. कोवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता यंत्रणा घटनास्थळी धाडली आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले.

मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू असतानाच, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा अक्षरशः धावली. सुपरवायझर घडशी, ज्येष्ठ कर्मचारी खांबे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सलग १२ तास जीवाचे रान करत दुरुस्तीचे काम पूर्ण केले.

विशेष म्हणजे, संध्याकाळच्या नियोजित वेळेपूर्वीच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा त्रास टळला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

या संपूर्ण कारवाईत पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांचे नेतृत्व ठळकपणे पुढे आले. तातडीचे निर्णय, प्रभावी समन्वय आणि कामावरील पकड यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित झाली. त्यांच्या तत्परतेमुळे एक मोठे संकट अवघ्या काही तासांत नियंत्रणात आणले गेले.

घटनेनंतर शहरभरातून श्री. कोवळे आणि त्यांच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत असून, “अशाच तत्पर आणि जबाबदार कामाची अपेक्षा आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!