konkandhara.com

13 मई 2026

konkandhara 2026 05 14T022119.923

वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.

कोलाड १३ एप्रिल (शरद जाधव) रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीत डंपिंग ग्राउंड मध्ये कचरा जाळण्याचे काम करणाऱ्या आदिवासी बांधवाचा मशीनचा इलेक्ट्रिक शॉक लागून दुर्दैव मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेली माहिती की सोमवार दिनांक 11 मे रोजी वरसे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे निवी येथील डम्पिंग ग्राउंड वर इलेक्ट्रिक मशीन च्या सहाय्याने यातील मयत इसम अशोक वाघमारे वय 42 वर्ष राहणार चनेरा (टेपरी) हा इलेक्ट्रिक मशीन वर कचरा जाळण्याचे काम करीत होता. अचानक त्याला मशीनचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर घटना ही अतिशय दुर्दैवी असून यामध्ये एका गरीब कष्टकरी आदिवासी बांधवांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर सदर घटनेची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे. सदर तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सुयेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्निल म्हात्रे सुनील सपकाळ करीत आहेत

वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू. Read More »

konkandhara 2026 05 14T020656.356

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास तेली आळी नाक्यावर घडली.अमन म्हापूसकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात राकेश गोविंद मकाने (19,रा.खालची आळी,रत्‍नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, संशयित आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्‍यांच्या 2025 मध्ये गणपती विसर्जनावेळी मांडवी येथे काही कारणावरुन वाद झाले होते. ते वादा तेव्हा सामंजस्याने सोडवण्यात आले होते.दरम्यान, सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास फिर्यादी राकेश मकाने हा त्‍याचा मित्र पार्थ ठाकूर सोबत तेली आळी नाका येथील एका दुकानात सामान खरेदी करण्यासाठी दुचाकीने गेला होता. ते दुचाकीवर बसलेल असताना संशयित अमन म्हापूसकर त्‍याठिकाणी आला त्‍याने आपल्या हातातील स्टिल धातूचे कडे काढून ते हातात पकडून फिर्यादी राकेच्या डोक्यात मागील बाजूस मारुन दुखापत केली. त्‍यानंतर त्‍याला ढकलून दिले. त्‍यावेळी पार्थ ठाकूरने त्‍यांचे भांडण सोडवले असता अमनने राकेशला तुला आता एवढेच मारले आहे तुला अजून मारेन अशी धमकी देउन निघून गेला. या मारहाणीत राकेशला दुखापत झाल्यामुळे त्‍याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल Read More »

konkandhara 2026 05 14T013120.704

नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्ग :भूषण सावंत : जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.बैठकीत कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी माहिती देताना सांगितले की, मंजूर कामांअंतर्गत एकूण ८ लाख ४६ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ६ लाख १३ हजार घनमीटर गाळ काढण्यात यश आले असून उर्वरित गाळ येत्या १० दिवसांत काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उर्वरित कामांसाठी अधिक यंत्रणा उपलब्ध करून गाळ काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत तेरेखोल नदीपात्रातील गाळ जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत तातडीने काढण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागास तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत नदीपात्र गाळ काढण्याच्या एकूण १७ कामांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी ५ कामे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत तर १२ कामे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत. या कामांपैकी बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून जिल्ह्यातील नदीपात्र गाळमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.तसेच आगामी सन २०२६-२७ या वर्षासाठी नदीपात्र गाळ काढण्याच्या नवीन प्रस्तावांचे अंदाजपत्रक तातडीने जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या. जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या या मोहिमेमुळे पूरस्थिती नियंत्रणास मदत होणार असून जलप्रवाह सुरळीत राहण्यासही मोठा हातभार लागणार आहे.या बैठकीला कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, यांत्रिकी विभागाचे उप अभियंता श्री. चौगुले, नाम फाऊंडेशनचे दिग्विजय पाटील, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश Read More »