konkandhara.com

9 मार्च 2026

dodamarg-panchayat-samiti-chairman-parvati-gawas-ganeshprasad-gawas

दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड

दोडामार्ग : भूषण सावंत दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सौ.पार्वती महादेव गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड जाहीर होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आणि पुष्पगुच्छ देऊन नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली.दुपारी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, झरेबांबर पंचायत समिती सदस्या श्रीमती स्नेहा गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य सौ.सायली स्वप्निल निंबाळकर, विभागप्रमुख अनिल शेटकर, माजी पंचायत समिती उपसभापती लक्ष्मण नाईक, रामदास मेस्त्री हे पदाधिकारी दाखल झाले. त्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपतालुकाप्रमुख आनंद तळणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, मणेरी पंचायत समिती सदस्या सौ.सोनिया अंकुश कुबल, माटणे पंचायत समिती सदस्या सौ.पार्वती महादेव गवस, माटणे जिल्हा परिषद सदस्य सौ.साक्षी तळवडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश उर्फ भैया नाईक, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, कळणे सरपंच श्री.देसाई, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सभापती पदासाठी माटणे पंचायत समिती सदस्य भाजपच्या सौ.पार्वती महादेव गवस यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर उपसभापती पदासाठी कोलझर पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस यांनी अर्ज सादर केला. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवड जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पेढे वाटले आणि नव्या सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पंचायत समितीत महायुतीची सत्ता अधिक बळकट झाल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड Read More »

लांजा : स्वयंपाकासाठी आणलेल्या कोळंबीचे वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७० वर्षीय वृद्ध आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव असून सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संतोष दिवाळे याने बाजारातून कोळंबी आणली होती. आई सुनिता यांनी कोळंबी साफ केल्यानंतर मुलगा संतोषला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून आईच्या डोक्यात मारहाण केली. तसेच शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिवाळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लांजा परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून मुलाने आईवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

कोळंबीच्या वाटणावरून मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोकणधारा लांजा : स्वयंपाकासाठी आणलेल्या कोळंबीचे वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७० वर्षीय वृद्ध आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव असून सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.संतोष दिवाळे याने बाजारातून कोळंबी आणली होती. आई सुनिता यांनी कोळंबी साफ केल्यानंतर मुलगा संतोषला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून आईच्या डोक्यात मारहाण केली. तसेच शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिवाळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लांजा परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून मुलाने आईवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

कोळंबीच्या वाटणावरून मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल Read More »

मळेवाड येथे डंपर-दुचाकीचा अपघात;बाप-लेक जखमी

मळेवाड येथे डंपर-दुचाकीचा अपघात;बाप-लेक जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा सावंतवाडी : मळेवाड-सावळवाडी येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दुचाकीस्वार पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत.यात औदुंबर बाबुराव खोत (वय – ४६) आणि त्यांचा मुलगा अथर्व खोत (वय – १०, दोघेही रा.कोंडुरे) अशी जखमींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की,आज सकाळच्या सुमारास कोंडूरे येथील औदुंबर खोत हे आपल्या मुलासह दुचाकीवरून मळवाड मार्गे शिरोडाच्या दिशेने जात होते यावेळी मळेवाड सावळवाडी येथील वळणावर आले असता अचानक ब्रेक लावल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि समोरून येणाऱ्या डंपरला जाऊन धडकली.या अपघातात दोघेही पिता – पुत्र जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी गाव घेतली आणि जखमींना मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अदिती ठाकूर व डॉक्टर विक्रम मस्के यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्य दाखल करण्यात आले.

मळेवाड येथे डंपर-दुचाकीचा अपघात;बाप-लेक जखमी Read More »

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

प्रतिनिधी : कोकणधारा वेंगुर्ला : वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे मातोंड पं. स.सदस्य शंकर शशिकांत घारे तर उपसभापतीपदी शिवसेनेचेपरुळे पं.स.सदस्य सचिन दामोदर देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे.पिठासन अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी ९ मार्च २०२६ रोजी झालेल्या सभेनंतर ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आदी उपस्थित होते.दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक – एक अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध संपन्न झाली.यावेळी या सभेस शंकर घारे,सचिन देसाई यांच्यासह म्हापण पं.स.सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर,तुळस पं.स.सदस्या सुचिता वजराटकर, आडेली पं.स.सदस्य नितीन मांजरेकर,वायंगणी पं.स.सदस्या शीतल राऊत,उभादांडा पं.स. सदस्या साक्षी नार्वेकर,आसोली पं.स.सदस्य संकेत धुरी,रेडी पं.स.सदस्या प्रियांका घाटवळ व शिरोडा पं.स.सदस्या योगिता परब आदी उपस्थित होते. निवड जाहीर होताच प्रशासन तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संचालक महेश सारंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाप्रमुख पप्पू परब, नगरसेवक प्रणव वायंगणकर व भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी Read More »

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

संजय पिळणकर सावंंतवाडी : येथिल पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची निवड झाली आहे तर उपसभापतीपदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड झाली.याबाबतची अधिकृत घोषणा आज सोमवारी करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस आणि कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पंचायत समितीमध्ये भाजपचे सहा,शिवसेनेचे सहा,अपक्ष पाच आणि ठाकरे गटाचा एक असे सदस्य उपस्थित होते. सभापती पद आरक्षित असल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली.जिल्हा परिषद मतदार संघातील पंचायत समिती सदस्या सुष्मिता जाधव यांचा या पदासाठी एकमेव अर्ज दाखल केला होता तर उपसभापती पदासाठी भाजपचे सदस्य गौरव मुळीक यांनी अर्ज भरला होता.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.या निवडीमुळे सावंतवाडी पंचायत समितीला २४ वे सभापती आणि ९ व्या महिला सभापती मिळाल्या आहेत.

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध Read More »

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी सोमवारी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक घेतली. या बैठकीत ठेकेदारांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार करून विविध समस्या व प्रश्न मांडले. नगराध्यक्षांनीही ठेकेदारांच्या अडचणी जाणून घेत संवाद साधला. या वेळी बोलताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले की, चिपळूण शहराला आकार देण्याचे महत्त्वाचे काम ठेकेदार बंधू करत असतात. त्यामुळे सर्वांनी उत्तम नियोजन करून दर्जेदार कामे करावीत. चिपळूण शहर स्मार्ट सिटी बनवण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्व ठेकेदारांचे सहकार्य आवश्यक आहे. या बैठकीला साठहून अधिक ठेकेदार उपस्थित होते. तसेच बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेवक योगेश पवार, मुख्याधिकारी संजय जाधव, बांधकाम विभागाचे श्री. डफळ, श्री. निंबाळकर, सचिन शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ठेकेदार सुरेश चिपळूणकर, सुरेश पवार, किसन चिपळूणकर व अभिजीत जाधव यांच्या वतीने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली. सर्व ठेकेदारांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याची भूमिका घेत चिपळूण शहराच्या विकासासाठी दर्जेदार कामे करण्याची ग्वाही दिली.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर Read More »

konkandhara 41

भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी (९ मार्च) दुपारी भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर नियंत्रण सुटून महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर आला असता अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनरचे चेसिस एका बाजूला तर लोखंडी सांगाडा सुमारे दीडशे फूटांहून अधिक खोल दरीत जाऊन पडला. दरम्यान, भोस्ते घाटातील ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या परिसराला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने यापूर्वीच ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित केले आहे. या भागात वारंवार अपघात होत असल्याने अपघात रोखण्यासाठी घाटाच्या बाजूला मजबूत संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.मात्र, तरीही या घाटात अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात Read More »

khed-panchayat-samiti-chairman-dr-afia-palekar

खेड पंचायत समिती सभापतीपदी डॉ. अफिया पालेकर, उपसभापतीपदी सुनील मोरे

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड करण्यात आली. उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. खेड पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या निवडणुकीदरम्यान सर्व प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून कामकाज पार पाडण्यात आले. पिठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली. आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर आणि उपसभापतीपदी सुनील मोरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी डॉ. अफिया पालेकर आणि सुनील मोरे यांना त्यांच्या दालनात नेऊन अधिकृत खुर्चीत विराजमान करून पदग्रहणाचा सोहळा पार पाडला. यावेळी उपस्थितांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर आणि उपसभापती सुनील मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

खेड पंचायत समिती सभापतीपदी डॉ. अफिया पालेकर, उपसभापतीपदी सुनील मोरे Read More »

ओमळीत अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा सन्मान | महिला दिन उपक्रम

ओमळीत अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा सन्मान | महिला दिन उपक्रम

प्रतिनिधी : कोकणधारा सावर्डे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओमळी गावात समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कष्टकरी महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम म्हणाल्या की, महिलांनी अनेक अडचणींवर मात करत प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र कष्टकरी महिलांना रोजच्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. स्त्री सन्मान हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. महिला दिनाचे औचित्य साधून समाजात निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम यांच्या संकल्पनेतून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा वावरे, सीआरपी संध्या सुर्वे, अरुणा घाडगे, वैष्णवी चव्हाण तसेच ज्ञानदीप वाचनालयाच्या सचिव सौ. बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात सन्मानित महिलांनीही आपले अनुभव व्यक्त केले. गावातील बालकांचे पोषण, आरोग्य आणि संगोपन यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने परिश्रम घेत असतात. त्यांच्या या कार्यामुळे समाजाच्या आरोग्यदायी भवितव्याला बळ मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ओमळीत अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा सन्मान | महिला दिन उपक्रम Read More »

अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रफुल्ल बाईत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा होताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन केले. या निवडीनंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर पंचायत समितीवर महायुतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि सभापतीपदासाठी शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेदरम्यान या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरा कोणताही अर्ज दाखल न झाल्याने शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी तर प्रफुल्ल बाईत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, राजेश मुकादम, राजेश पत्याणे, प्रमोद पवार, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रोहन बने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम, वैभव पवार, राजन कापडी, संजय कदम, राजेंद्र सुर्वे, हेमंत शिंदे, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, दिलीप बोथले, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, यशवंत गोपाळ, पंकज पुसाळकर, पप्पू नाखरेकर, बापू शिंदे, मंगेश दळवी, प्रसाद सावंत, सचिन मांगले, योगेश शिंदे आदींसह पंचायत समितीचे सदस्य, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव व पूजा निकम यांनी नूतन सभापती व उपसभापतींना शुभेच्छा देत संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. नूतन सभापती शर्वरी वेल्ये आणि उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनीही वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर दोघांनाही सभागृहात त्यांच्या पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले.

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह Read More »