konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध
सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव; उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

संजय पिळणकर

सावंंतवाडी : येथिल पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची निवड झाली आहे तर उपसभापतीपदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड झाली.याबाबतची अधिकृत घोषणा आज सोमवारी करण्यात आली.


ही निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस आणि कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पंचायत समितीमध्ये भाजपचे सहा,शिवसेनेचे सहा,अपक्ष पाच आणि ठाकरे गटाचा एक असे सदस्य उपस्थित होते.

सभापती पद आरक्षित असल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली.जिल्हा परिषद मतदार संघातील पंचायत समिती सदस्या सुष्मिता जाधव यांचा या पदासाठी एकमेव अर्ज दाखल केला होता तर उपसभापती पदासाठी भाजपचे सदस्य गौरव मुळीक यांनी अर्ज भरला होता.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.या निवडीमुळे सावंतवाडी पंचायत समितीला २४ वे सभापती आणि ९ व्या महिला सभापती मिळाल्या आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे