konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • कोळंबीच्या वाटणावरून मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल
लांजा : स्वयंपाकासाठी आणलेल्या कोळंबीचे वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७० वर्षीय वृद्ध आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव असून सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संतोष दिवाळे याने बाजारातून कोळंबी आणली होती. आई सुनिता यांनी कोळंबी साफ केल्यानंतर मुलगा संतोषला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून आईच्या डोक्यात मारहाण केली. तसेच शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिवाळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लांजा परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून मुलाने आईवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

कोळंबीच्या वाटणावरून मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोकणधारा

लांजा : स्वयंपाकासाठी आणलेल्या कोळंबीचे वाटण करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७० वर्षीय वृद्ध आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत दिवाळे (वय ३५, रा. धावणेवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव असून सुनिता गणपत दिवाळे (वय ७०) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
संतोष दिवाळे याने बाजारातून कोळंबी आणली होती. आई सुनिता यांनी कोळंबी साफ केल्यानंतर मुलगा संतोषला मसाल्याचे वाटण करण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने घरातील दगडी वरवंटा उचलून आईच्या डोक्यात मारहाण केली. तसेच शर्टाने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिवाळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे लांजा परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून मुलाने आईवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान