konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • खेड पंचायत समिती सभापतीपदी डॉ. अफिया पालेकर, उपसभापतीपदी सुनील मोरे
khed-panchayat-samiti-chairman-dr-afia-palekar

खेड पंचायत समिती सभापतीपदी डॉ. अफिया पालेकर, उपसभापतीपदी सुनील मोरे

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड करण्यात आली. उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

खेड पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या निवडणुकीदरम्यान सर्व प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून कामकाज पार पाडण्यात आले. पिठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली.

आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर आणि उपसभापतीपदी सुनील मोरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी डॉ. अफिया पालेकर आणि सुनील मोरे यांना त्यांच्या दालनात नेऊन अधिकृत खुर्चीत विराजमान करून पदग्रहणाचा सोहळा पार पाडला. यावेळी उपस्थितांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर आणि उपसभापती सुनील मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे