konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड
dodamarg-panchayat-samiti-chairman-parvati-gawas-ganeshprasad-gawas

दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पार्वती गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड

दोडामार्ग : भूषण सावंत

दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सौ.पार्वती महादेव गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस या दोघांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड जाहीर होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आणि पुष्पगुच्छ देऊन नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.


पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली.
दुपारी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, झरेबांबर पंचायत समिती सदस्या श्रीमती स्नेहा गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य सौ.सायली स्वप्निल निंबाळकर, विभागप्रमुख अनिल शेटकर, माजी पंचायत समिती उपसभापती लक्ष्मण नाईक, रामदास मेस्त्री हे पदाधिकारी दाखल झाले.


त्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपतालुकाप्रमुख आनंद तळणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, मणेरी पंचायत समिती सदस्या सौ.सोनिया अंकुश कुबल, माटणे पंचायत समिती सदस्या सौ.पार्वती महादेव गवस, माटणे जिल्हा परिषद सदस्य सौ.साक्षी तळवडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश उर्फ भैया नाईक, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, कळणे सरपंच श्री.देसाई, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


सभापती पदासाठी माटणे पंचायत समिती सदस्य भाजपच्या सौ.पार्वती महादेव गवस यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर उपसभापती पदासाठी कोलझर पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस यांनी अर्ज सादर केला. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.


निवड जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पेढे वाटले आणि नव्या सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पंचायत समितीत महायुतीची सत्ता अधिक बळकट झाल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे