konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी
वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध ; उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

प्रतिनिधी : कोकणधारा


वेंगुर्ला : वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे मातोंड पं. स.सदस्य शंकर शशिकांत घारे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे
परुळे पं.स.सदस्य सचिन दामोदर देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे.पिठासन अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी ९ मार्च २०२६ रोजी झालेल्या सभेनंतर ही निवड जाहीर करण्यात आली.


यावेळी गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आदी उपस्थित होते.दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक – एक अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध संपन्न झाली.यावेळी या सभेस शंकर घारे,सचिन देसाई यांच्यासह म्हापण पं.स.सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर,तुळस पं.स.सदस्या सुचिता वजराटकर, आडेली पं.स.सदस्य नितीन मांजरेकर,वायंगणी पं.स.सदस्या शीतल राऊत,उभादांडा पं.स. सदस्या साक्षी नार्वेकर,आसोली पं.स.सदस्य संकेत धुरी,रेडी पं.स.सदस्या प्रियांका घाटवळ व शिरोडा पं.स.सदस्या योगिता परब आदी उपस्थित होते.


निवड जाहीर होताच प्रशासन तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संचालक महेश सारंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाप्रमुख पप्पू परब, नगरसेवक प्रणव वायंगणकर व भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे