konkandhara.com

Editorial

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान

पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. ‘दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान Read More »

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान Read More »

Copy of Nagarpalika 22

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने

महादेववाडी | कोंकणधारा डेस्क:श्रीराम महादेववाडी येथे चिमुकल्यांनी आयोजित केलेल्या १४ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडून सामने सुरू झाले आहेत. ही स्पर्धा आजपासून सुरू असून उद्या पर्यंत सामने सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेत विभागातील आंबेवाडी, मोहोल्ला, महादेववाडी, बैतवाडी, कोलाडवाडी, पुई तसेच परिसरातील इतर संघांनी सहभाग नोंदवला आहे. रायगड जिल्ह्यात क्रिकेटची मोठी परंपरा असून प्रामुख्याने प्रौढ वयोगटातील भव्य स्पर्धा पाहायला मिळतात. मात्र, चिमुकल्यांनी स्वतः पुढाकार घेत भरवलेली ही स्पर्धा विशेष कौतुकास्पद ठरत आहे. 🏏 सामने रंगात; चिमुकल्यांचा उत्साह शिगेला स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सामने चांगलेच रंगले असून मैदानावर खेळाडूंचा उत्साह, शिस्त आणि संघभावना पाहायला मिळत आहे. लहान वयातच स्पर्धात्मक खेळाचा अनुभव मिळाल्याने भविष्यातील खेळाडू घडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. 🏆 पारितोषिकांची घोषणा; वितरण उद्या या स्पर्धेसाठी पारितोषिकांची आधीच घोषणा करण्यात आली असून,प्रथम पारितोषिक – संतोष बैत (अण्णा)द्वितीय पारितोषिक – चिरंजीव भिंगारेतृतीय पारितोषिक – प्रणय सागवेकर तसेच मॅन ऑफ द मॅच (बॉलर) आणि मॅन ऑफ द मॅच (बॅट्समन) या विशेष पुरस्कारांचे वितरण उद्या अंतिम सामन्यानंतर करण्यात येणार आहे. या विशेष पारितोषिकांसाठी VRO समूहाकडून सहकार्य लाभत आहे. 🧒 स्थानिकांकडून कौतुक या स्पर्धेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लहान वयातच अशा उपक्रमांमधून खेळाडू घडतात, अशी भावना पालक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने Read More »

Copy of Nagarpalika 21

महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली?

कोंकणधारा प्रतिनिधी | रोहामहावितरणच्या सोनवणे ह्या कनिष्ठ अभियंत्याकडून (JE) वैयक्तिक वीजमीटरवरील थकबाकी न भरल्यास खासगी मर्यादित कंपनीच्या (Pvt Ltd) नावावरील वीजपुरवठा तोडण्याची उघड धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या नावावरील वीजबिल नियमितपणे भरलेले असून कोणतीही थकबाकी नसताना हा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप संबंधित ग्राहकाने केला आहे. हा प्रकार महावितरण च्या नियमांनाच नव्हे, तर विद्युत अधिनियम आणि प्रशासकीय शिस्तीलाही थेट आव्हान देणारा ठरत आहे. दोन मीटर, दोन स्वतंत्र ग्राहक – तरीही दबाव का? संबंधित ठिकाणी एकाच जागी दोन स्वतंत्र वीज कनेक्शन आहेत. एक कनेक्शन वैयक्तिक नावावर असून त्या मीटरचा वीजपुरवठा खंडित असतानाही तब्बल एका वर्षासाठी किमान (Minimum) वीजबिल आकारण्यात आले. त्यामुळे सुमारे ४२ हजार रुपयांची थकबाकी निर्माण झाली. या थकबाकीबाबत ग्राहकाने हरकती नोंदवल्या असतानाही, त्याच ठिकाणी असलेल्या आणि नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या खासगी कंपनीच्या वीजपुरवठ्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, “वैयक्तिक थकबाकी भरली नाही, तर कंपनीचा वीजपुरवठा कापू,”अशी थेट तोंडी धमकी कनिष्ठ अभियंत्याकडून देण्यात आली. कायदा स्पष्ट असताना अधिकारांचा गैरवापर? विद्युत अधिनियम, 2003 च्या कलम 56 नुसार, कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी त्या त्याच ग्राहकाला लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई केवळ त्या ग्राहक क्रमांकापुरतीच मर्यादित असते. तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) च्या पुरवठा संहितेत स्पष्टपणे नमूद आहे की, “एका ग्राहकाची थकबाकी दुसऱ्या स्वतंत्र ग्राहकाच्या वीजपुरवठ्यावर लागू करता येत नाही.” तज्ज्ञांच्या मते, वैयक्तिक ग्राहक आणि खासगी मर्यादित कंपनी हे कायदेशीरदृष्ट्या दोन स्वतंत्र घटक (Independent Legal Entities) आहेत. त्यामुळे एका ग्राहकाच्या थकबाकीचा आधार घेऊन दुसऱ्या ग्राहकावर दबाव टाकणे हे नियमबाह्य असून प्रशासकीय मनमानी ठरू शकते. तोंडी धमकी, लेखी आदेश नाही महावितरणच्या कार्यपद्धतीनुसार कोणतीही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ही लेखी नोटीस, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता आणि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच केली जाते. मात्र या प्रकरणात कोणतीही लेखी नोटीस किंवा आदेश नसून केवळ तोंडी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्याची चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण या घटनेमुळे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.“आज वैयक्तिक थकबाकीपोटी कंपनीवर कारवाई होत असेल, तर उद्या कुणाच्याही वीजपुरवठ्यावर मनमानी होऊ शकते,” अशी भावना अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. पुढे काय? प्रशासनाची भूमिका काय असणार या गंभीर प्रकरणाबाबत संबंधित ग्राहकाने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच गरज भासल्यास ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) आणि वीज लोकपाल (Ombudsman) यांच्याकडेही दाद मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नियम स्पष्ट असताना आणि कंपनीचे वीजबिल नियमित भरलेले असतानाही दबाव टाकण्यासाठी वीजपुरवठा तोडण्याची धमकी दिली जात असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली? Read More »

Copy of Nagarpalika 20

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर

पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपकडून महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर पनवेल | प्रतिनिधी – संकेत गायकवाड:पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष यांनी महत्त्वाचा निर्णय घेत महापौर व उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी श्री. नितीनभाई पाटील तर उपमहापौर पदासाठी सौ. प्रमिला रवींद्र पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेमुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, महापालिकेच्या नेतृत्वाबाबतचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे.सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा पनवेल महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी भाजपकडून करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महापौर आणि उपमहापौर हे महापालिकेतील सर्वोच्च पदे असल्याने, या पदांवर कोण नेतृत्व करणार याकडे शहरातील नागरिकांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांचे लक्ष लागले होते. उमेदवार जाहीर होताच आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. विकासकेंद्री नेतृत्वावर भाजपचा भर भाजपने नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांची निवड करताना शहराच्या विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि समन्वयात्मक नेतृत्व देण्याचा विचार केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पनवेल शहर झपाट्याने विकसित होत असून, वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधा हे प्रमुख प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उमेदवारांच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अभिनंदनाचे संदेश, सोशल मीडियावर शुभेच्छा आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी महापालिका कामकाजात भाजपचे नेतृत्व कसे राहील, याबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. 🔍 पुढील घडामोडींवर लक्ष महापौर व उपमहापौर उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवड प्रक्रिया, पदभार स्वीकारण्याची तारीख आणि महापालिकेतील सत्तावाटप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विरोधी पक्षांची भूमिका काय असेल, यावरही पनवेलच्या राजकारणात पुढील समीकरणे ठरणार आहेत. पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपने महापौर व उपमहापौर पदांचे उमेदवार जाहीर करत सत्तास्थापनेच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहराच्या विकासाला कोणती दिशा मिळते, याकडे आता नागरिकांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर Read More »

Copy of Nagarpalika 19

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त

महाड ZP–पं.स. निवडणूक: अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदान प्रक्रिया निर्भय, शांततामय आणि पारदर्शक पार पडावी, यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी आणि दोन स्पेशल फोर्स निवडणूक काळात कार्यरत राहणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक; संवेदनशीलतेची पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यात ७ फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ५ गट आणि पंचायत समितीसाठी १० गण यांची निवडणूक होत आहे. काही दिवसांपूर्वीच महाड नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या मतदानाच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या राडा-प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी यावेळी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. संचलन व प्रतिबंधात्मक उपाय निवडणूकपूर्व तयारीचा भाग म्हणून दासगाव, खर्डी आणि बिरवाडी बाजारपेठ या तीन संवेदनशील ठिकाणी पोलिसांमार्फत दोन दिवसांपूर्वी संचलन (रूट मार्च) करण्यात आले. या संचलनाद्वारे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, समाजकंटकांवर वचक ठेवणे आणि संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे, हा उद्देश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. २०३ मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त महाड तालुक्यात एकूण २०३ मतदान केंद्रे आहेत. या अंतर्गत महाड शहर, महाड तालुका आणि एमआयडीसी अशी तीन पोलीस ठाणे कार्यरत आहेत. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून हा बंदोबस्त ६ आणि ७ फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी राहणार आहे. पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्ताची आकडेवारी निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने पुढीलप्रमाणे मनुष्यबळ तैनात केले आहे— एमआयडीसी पोलीस ठाणे:१०५ होमगार्ड, ६५ पोलीस अंमलदार महाड शहर पोलीस ठाणे:२१२ होमगार्ड, १८८ पोलीस अंमलदार आणि १२ अधिकारी महाड तालुका पोलीस ठाणे:१४१ होमगार्ड, ७० पोलीस अंमलदार आणि ५ अधिकारी या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार आणि १७ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, एक प्लाटून (१ अधिकारी व २३ पोलीस अंमलदार) तसेच एक सेक्शनमध्ये ८ पोलीस अंमलदार स्वतंत्रपणे तैनात राहणार आहेत. गावपातळीवरही सतर्कता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा-प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, यावेळी गावपातळीवरील पोलीस पाटील यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचाली, जमाव जमवणे, दारू-प्रलोभन किंवा अफवा पसरवण्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन, जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल. शांततामय निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, स्पेशल फोर्स, संचलन आणि गावपातळीवरील सतर्कतेच्या उपाययोजनांमुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. आता ७ फेब्रुवारी रोजी मतदारांचा प्रतिसाद आणि निवडणूक प्रक्रियेतील शिस्त याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त Read More »

Copy of Nagarpalika 18

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; मुख्यमंत्र्यांचे चौकशी आदेश

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; चौकशीचे आदेश, राजकीय प्रतिक्रिया तीव्र मुंबई | कोंकणधारा डेस्क:मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर टँकर पलटी झाल्याने निर्माण झालेल्या भीषण वाहतूककोंडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेमुळे तब्बल 32 तास हा महत्त्वाचा महामार्ग ठप्प झाला होता. हजारो प्रवासी, खासगी वाहने, अवजड ट्रक आणि बस या कोंडीत अडकल्या होत्या. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न आणि वैद्यकीय मदतीअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी 24 तास उलटूनही बोरघाट परिसरात पुन्हा वाहने बंद पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ वाहतूक थांबवण्यात आली. मात्र टँकर हटविण्याची प्रक्रिया, पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांचा समन्वय अपेक्षित गतीने न झाल्याने वाहतूककोंडी तासन्‌तास वाढत गेली. परिणामी तब्बल 32 तास प्रवासी अडकून पडले आणि महामार्गावरील हालअपेष्टांचे दृश्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. 🛣️ बोरघाटात पुन्हा वाहतूक ठप्प टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात बोरघाट परिसरात अनेक अवजड वाहने बंद पडल्याने पुन्हा एकदा संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. जोपर्यंत ही वाहने हटविली जाणार नाहीत, तोपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरळीत होणे कठीण असल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि वाहतूक पोलिसांनी सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांची दखल; चौकशीचे आदेश या गंभीर घटनेची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि घडल्यास तत्काळ व परिणामकारक उपाययोजना कशा करता येतील, याबाबत चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी एमएसआरडीसी ला दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावर वाहतूक व्यवस्थापन, अवजड वाहनांची हालचाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आराखडा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश या वाहतूककोंडीची गंभीर दखल एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देत, दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या कोंड्या आणि अपघात लक्षात घेता, पायाभूत सुविधांची सुधारणा तातडीने आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. राज ठाकरेंचा सरकारला सवाल या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि नेहमीप्रमाणे सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश दिले गेले,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “अशा अनेक घटनांच्या चौकशा होतात; पण त्यातून प्रशासन काही बोध घेतो का, हा खरा प्रश्न आहे.” टँकर पलटीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवणे योग्य होते, हे मान्य करताना त्यांनी प्रशासनाकडे किमान वेळेत रस्ता मोकळा करण्याचा कृती आराखडा तयार होता का, असा थेट सवालही उपस्थित केला. प्रवाशांचे हाल आणि जनतेचा रोष वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांना उघड्यावर रात्र काढावी लागली. काही ठिकाणी अन्न-पाण्याची टंचाई, वृद्ध व लहान मुलांचे हाल आणि रुग्णवाहिकांना मार्ग न मिळण्याच्या घटनाही समोर आल्या. सोशल मीडियावरून अनेकांनी प्रशासनाच्या तयारीअभावी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ही घटना केवळ एक अपघात नसून आपत्कालीन व्यवस्थापनातील उणिवा उघड करणारी ठरली आहे. चौकशी अहवाल आणि राजकीय आश्वासनांपलीकडे जाऊन ठोस कृती आराखडा, तांत्रिक सज्जता आणि समन्वयाची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा घटनांमुळे प्रवाशांना पुन्हा हाल सहन करावे लागू नयेत, यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; मुख्यमंत्र्यांचे चौकशी आदेश Read More »

Copy of Nagarpalika 17

ZP निवडणूक: रामदास कदमांची सुनील तटकरे व भास्कर जाधवांवर टीका

जिल्हा परिषद निवडणूक: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोकणात आरोप–प्रत्यारोप कोकण | कोंकणधारा डेस्क:जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना विविध पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी “गलिच्छ राजकारण” केले. शरद पवार यांना शह देण्यासाठी वहिनींना तातडीने शपथ घ्यायला लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच शपथविधी करण्यात आला. दहा दिवस थांबले असते तर काय झाले असते?” असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. तटकरेंवर गंभीर आरोप रामदास कदम यांनी पुढे असा दावा केला की, शरद पवार ताबा घेतील या भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला. तटकरेंची ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले. “सुनील तटकरे हे विश्वासघातकी असून, ज्यांनी त्यांना मोठे केले त्यांनाच संपवण्याचे काम त्यांनी केले,” असा आरोपही कदम यांनी केला. लोकसभेच्या संदर्भात बोलताना कदम म्हणाले की, “मी त्यांना लोकसभेत निवडून आणले; मात्र योगेश कदम यांना पाडण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या सर्व आरोपांवर सुनील तटकरे यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. भास्कर जाधवांवरही प्रत्युत्तर दरम्यान, याच दिवशी भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर देताना कदम यांनी जाधव यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली. भास्कर जाधव यांचा “तोल गेला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असा आरोप करत त्यांनी गुहागर मतदारसंघात पराभव दिसत असल्यानेच ते अशी वक्तव्ये करत असल्याचे म्हटले. कदम यांनी जाधव यांच्याशी संबंधित काही जुने राजकीय संदर्भ देत, “१९९५ मध्ये त्यांना आमदारकीची संधी मीच दिली आणि शिवसेनेत आणले,” असा दावा केला. या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वातावरण तापले जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अशा आरोप–प्रत्यारोपांमुळे कोकणातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार, सभांमधील भाषणं आणि माध्यमांतील आरोप यामुळे मतदारांमध्येही चर्चा रंगताना दिसत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय नेत्यांमधील आरोप–प्रत्यारोप हे निवडणूक वातावरणाचा भाग बनले असले, तरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या वक्तव्यांमुळे कोकणातील राजकारणात नवी खळबळ उडाली असून, संबंधित नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

ZP निवडणूक: रामदास कदमांची सुनील तटकरे व भास्कर जाधवांवर टीका Read More »

Copy of Nagarpalika 16

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार

मुंबई | कोंकणधारा डेस्क:राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौर निवडणुकीबाबत महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी ११ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला जाणार असून, ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आल्याने ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची रणनीती चर्चेत सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ठाकरे गट थेट मैदानात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सहकार्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक अधिकच लक्षवेधी बनली आहे. आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स कायम ठेवला या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट भूमिका मांडण्याऐवजी सस्पेन्स कायम ठेवला आहे. “आमची तयारी सुरू आहे. आम्ही उमेदवार देणार की नाही, हे तुम्हाला लवकरच समजेल. याबाबत आत्ता काही बोलणार नाही,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बीएमसीची निवडणूक होऊन गेली आहे. आता शहराशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा; आमच्या पक्षाची माणसं कामाला लागली आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महापौर निवडणुकीचा तिढा आणखी वाढल्याचे मानले जात आहे. आरक्षण सोडतीनंतर समीकरण बदलले मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौरपद कोणत्या पक्षाकडे जाणार, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,” असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.दरम्यान, महापौरपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपचा महापौर होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, ठाकरे गट उमेदवार देणार असल्यास ही निवडणूक थेट लढतीत जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ट्रॅफिकवरही भाष्य दरम्यान, मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “पत्रव्यवहार करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश द्यायला हवेत. एमएसआरडीसी कोणाकडे आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसतील,” असा टोला त्यांनी लगावला. “३२ तास लोक वाहतूक कोंडीत अडकले होते. फोटो काढायला पुढे असणारे मंत्री त्या दिवशी कुठे होते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी टोल ऑपरेटरांनी रिफंड आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली. चौकशी आणि क्लीन चिट देण्याची प्रथा मागील चार वर्षांपासून सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, किमान प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवणे, पर्यायी लेन सुरू करणे किंवा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. “हेलिकॉप्टरचा वापर मंत्री प्रचारासाठी करतात; त्याच माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांना मदत करता आली असती,” असेही त्यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या हालचालींमुळे राजकीय सस्पेन्स वाढला आहे. बिनविरोध निवडणूक होणार की थेट लढत पाहायला मिळणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहराच्या प्रशासकीय आणि वाहतूक प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप–प्रत्यारोपांमुळे मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार Read More »

Copy of Nagarpalika 15

ZP निवडणूक: भास्कर जाधवांची रामदास कदमांवर तीव्र टीका

रत्नागिरी | कोंकणधारा डेस्क:जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांचे नेते कमी वेळेत अनेक ठिकाणी हजेरी लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी माजी मंत्री व रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. खेड येथील प्रचार सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यांवर आणि भूमिकेवर टीकात्मक टिप्पणी केली. भास्कर जाधवांचे आरोप भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक पातळीवरील आरोप करताना म्हटले की, “रामदास कदम कुठेही गेले तरी दुसऱ्यांच्या नावाने टीका करतात.” त्यांनी कदम यांच्या वागणुकीवर आणि राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, “रामदास कदम यांना स्वतःच्या कृतींचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी जाधव यांनी आपल्या कुटुंबाविषयी बोलताना, “माझा मुलगा मेहनतीने पुढे गेला आहे,” असे सांगत अप्रत्यक्षपणे कदम यांच्या टीकेला उत्तर दिले. या भाषणात त्यांनी काही जुने राजकीय संदर्भ मांडत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. विकासकामांवरूनही टीका भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या कार्यकाळातील काही विकासकामांचा उल्लेख करत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खाडी पुलावरील कर्जी पुलाचा संदर्भ देत त्यांनी, “टेंडर निघालेल्या पुलाच्या अंदाजपत्रकाबाबत चुकीच्या सूचना देण्यात आल्या,” असा आरोप केला. या माध्यमातून त्यांनी कदम यांच्या प्रशासकीय निर्णयक्षमतेवर टीका केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण तापले आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार प्रचार सभा झाल्या. या सभांमध्ये अनेक नेत्यांनी एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप केले. भास्कर जाधव यांच्या टीकेनंतर रामदास कदम यांनीही प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण अधिक आक्रमक झाले आहे. नेत्यांमधील आरोप–प्रत्यारोपांमुळे निवडणूक प्रचाराला धार आली असली, तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हाती आहे. मतदानानंतरच या राजकीय संघर्षाचा निकाल स्पष्ट होणार असून, तोपर्यंत अशा वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चा रंगत राहण्याची शक्यता आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

ZP निवडणूक: भास्कर जाधवांची रामदास कदमांवर तीव्र टीका Read More »